Ashutosh Ranka : काॅक्रोच जनता पार्टी पुन्हा रस्त्यावर उतरणार..., सरकारकडून 'त्या' कराराचे उल्लंघन; केंद्रीय मंत्र्यांना थेट इशारा

Cockroach Janata Party : दिल्लीमध्ये आंदोलनकर्त्यांना रसद व इतर मदत पुरवणाऱ्या स्वयंसेवकांना ताब्यात घेतल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना अटक करण्यात येत असल्याचा दावा आशितोष रांका म्हणाले.
Ashitosh Ranga Warns of Fresh Protest Over Student Arrests | Cockroach Janata Party
Ashitosh Ranga Warns of Fresh Protest Over Student Arrests | Cockroach Janata PartySarkarnama
Published on
Updated on

Ashutosh Ranka News: जंतर मंतरवरील काॅक्रोच जनता पार्टीने सरकारच्या तीन आश्वासनानंतर आपले आंदोलन मागे घेतले. धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबत विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करणार नाही, अशी लेखी हमी केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी दिली होती. मात्र, विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले जात असून त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचे समोर आले आहे. याबाबत ट्विट करत काॅक्रोज जनता पार्टीचे प्रवक्ते आशितोष रांका यांनी ट्विट करत थेट इशार दिला आहे.

ते म्हणाले, आंदोलनकर्त्यांवर कोणतीही पोलिस कारवाई होणार नाही, या कराराचे पूर्णपणे उल्लंघन होत असल्याचे आम्ही पाहत आहोत. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये शेकडो विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे, तर दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये शेकडो विद्यार्थ्यांवर पाळत ठेवली जात आहे आणि त्यांचा छळ केला जात आहे.

दिल्लीमध्ये आंदोलनकर्त्यांना रसद व इतर मदत पुरवणाऱ्या स्वयंसेवकांना ताब्यात घेतल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. आमची ठाम मागणी आहे की आंदोलनकर्त्यांविरोधात दाखल करण्यात आलेले सर्व एफआयआर तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

Ashitosh Ranga Warns of Fresh Protest Over Student Arrests | Cockroach Janata Party
Arvind Kejriwal : दिल्ली संसद मार्च : जखमी अन् अटकेतील विद्यार्थ्यांसाठी केजरीवालांची मोठी घोषणा; हेल्पलाईन नंबरसह लिगल टीम तैनात...

अंमलबजावणीची लेखी माहिती द्या

अटक केलेल्या विद्यार्थ्यांची त्वरित सुटका करावी आणि दिल्ली पोलिस, केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा तसेच भाजप-समर्थित राज्यांतील पोलिसांनी भविष्यात कोणतेही नवीन एफआयआर दाखल करू नयेत. हे आमच्या करारानुसार अपेक्षित आहे. अन्यथा, आम्हाला पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यास भाग पाडले जाईल.

तसेच, कायदेशीर प्रकरणांबाबत झालेल्या लिखित कराराची प्रत आणि भारत सरकारशी ठरलेल्या कालबद्ध अंमलबजावणीची माहिती आम्हाला उद्यापर्यंत लेखी स्वरूपात देण्यात यावी, अशीही आमची मागणी आहे.

Ashitosh Ranga Warns of Fresh Protest Over Student Arrests | Cockroach Janata Party
Arvind Kejriwal : दिल्ली संसद मार्च : जखमी अन् अटकेतील विद्यार्थ्यांसाठी केजरीवालांची मोठी घोषणा; हेल्पलाईन नंबरसह लिगल टीम तैनात...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com