Arvind Kejriwal : दिल्ली संसद मार्च : जखमी अन् अटकेतील विद्यार्थ्यांसाठी केजरीवालांची मोठी घोषणा; हेल्पलाईन नंबरसह लिगल टीम तैनात...

Legal assistance for detained students in Delhi protest : दिल्ली संसद मार्चदरम्यान जखमी आणि अटकेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अरविंद केजरीवाल यांनी हेल्पलाईन क्रमांक आणि विशेष लिगल टीमची घोषणा केली. जाणून घ्या संपूर्ण माहिती
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

Delhi Parliament March : दिल्लीतील संसद मार्च आंदोलनानंतर जखमी आणि अटकेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तसेच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विद्यार्थ्यांसाठी कायदेशीर आणि वैद्यकीय मदतीची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये केजरीवाल म्हणाले, काल मुलांवर झालेला अत्याचार अत्यंत लाजिरवाणा आहे. कोणत्याही मुलाला कायदेशीर किंवा वैद्यकीय मदतीची गरज असल्यास, या क्रमांकावर संपर्क साधा - हेल्पलाइन क्रमांक - 85-888-33548. आम्ही तुमच्यासाठी एक कायदेशीर टीम उपलब्ध करून देऊ. आपण सर्व एक आहोत. तुम्ही सर्व आमची मुले आहात. अजिबात घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. आपण ही लढाई एकत्र लढू.

Arvind Kejriwal
Shiv Sena UBT : ओमराजेंसह 6 खासदारांना विलीनीकरण भोवणार? अधिवेशन सुरू असतानाच ठाकरेंची 'सुप्रीम' चाल...

यासोबतच आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक व्हिडिओंचा उल्लेख करत त्यांनी विद्यार्थ्यांवर अत्याचार झाल्याचा आरोप केला. काही दृश्यांमध्ये विद्यार्थी पोलिसांकडे मदतीची विनंती करताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी विद्यार्थिनी हात जोडून विनवणी करत असतानाही त्यांच्यावर कारवाई होत असल्याचा दावा त्यांनी केला.

केजरीवाल म्हणाले की, अनेक व्हिडिओंमध्ये कोणतीही चिथावणी नसताना निःशस्त्र विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचे दिसून येते. एका व्हिडिओमध्ये काही पोलिस कर्मचारी रस्त्यावर उभे होते आणि तेथून जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला लाठ्यांनी मारताना दिसत होते. विद्यार्थ्यांकडून कोणताही हल्ला किंवा आक्रमक वर्तन होत नसतानाही त्यांच्यावर बलाचा वापर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

Arvind Kejriwal
Maharashtra Child Friendly Gram Panchayat : आदिती तटकरेंची ‘बालस्नेही ग्रामपंचायत’ अन् ‘बालस्नेही प्रभाग’ संकल्पना काय आहे?

विद्यार्थी आणि पालकांना धीर देताना केजरीवाल म्हणाले, "मुले कोणावरही हल्ला करत नव्हती, तरीही पोलीस त्यांच्यावर लाठीचार्ज करत होते. आम्ही यापूर्वी असे अत्याचार कधीही पाहिले नाहीत. मला देशातील मुलांना आणि त्यांच्या पालकांना सांगायचे आहे की, अजिबात काळजी करू नका. आपण सर्वजण यात एकत्र आहोत. हा संपूर्ण देश एक कुटुंब आहे आणि कोणालाही हुकूमशहांची भीती बाळगण्याची गरज नाही."

विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र लीगल टीम तयार करण्यात आल्याचे सांगत त्यांनी कोणत्याही दबावाला किंवा धमक्यांना घाबरू नये, असे आवाहन केले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावरून केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली. आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या इशाऱ्यावर त्यांनी आक्षेप घेत सरकारने धमकावण्याचे राजकारण थांबवावे, असे म्हटले. त्यामुळे दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन आणि त्यानंतरच्या राजकीय प्रतिक्रिया यांची देशभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com