Congress MLAs not reachable : भाजपने भुकंपाची तयारी करताच काँग्रेसचा बडा नेता मैदानात : 'प्लॅन' उधळण्यासाठी 6 आमदारांची 'संकटमोचकाकडे' रवानगी

six congress legislators unreachable controversy : काँग्रेसचे 6 आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकारणात खळबळ. आमदार पळवापळवी की बंडाची तयारी? सत्तासंघर्षाची नवी चर्चा रंगली.
Congress
Congress Sarkarnama
Published on
Updated on

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपकडून क्रॉस व्होटिंग आणि आमदारांची फोडाफोड होण्याची शक्यता लक्षात घेऊन काँग्रेसने आपले आमदार सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील 10 राज्यांतील 37 राज्यसभेच्या जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे.

या पार्श्वभूमीवर ओडिशातील राजकारणात अचानक मोठ्या हालचाली दिसू लागल्या आहेत. भाजपकडून क्रॉस व्होटिंग घडवून आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत काँग्रेसने सहा आमदारांना थेट कर्नाटकातील बेंगळुरू येथे हलवले आहे. या घडामोडीमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

काँग्रेस विधानमंडळ पक्षाचे नेते रामचंद्र कदम यांनी या निर्णयाची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की पक्षाचे काही आमदार सध्या बेंगळुरूच्या बाहेरील भागातील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहेत. आमदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव येऊ नये आणि संभाव्य ‘हॉर्स ट्रेडिंग’पासून त्यांना दूर ठेवता यावे, यासाठी हा उपाय करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे सर्व आमदार पक्षासोबत ठामपणे उभे आहेत, असा दावा त्यांनी केला.

Congress
UPSC Result Controversy : IPS असतानाही EWS कोटा? UPSC 2025 च्या निकालात नवीन ट्विस्ट; सोशल मीडियावर 'या' उमेदवाराची जोरदार चर्चा!

बेंगळुरूला पाठवण्यात आलेल्या आमदारांमध्ये पक्षाचे मुख्य शिस्तपालक सी. एस. राजेन एक्का, प्रफुल्ल प्रधान, मंगू खिला, अशोक दास, पवित्र साउंता, राजन एक्का आणि कद्रका अप्पाला स्वामी यांचा समावेश आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी या आमदारांना तातडीने बेंगळुरूला बोलावल्याचे सांगितले जात आहे. संभाव्य राजकीय घडामोडींना आळा घालण्यासाठी या आमदारांना शहराबाहेरील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसने आमदारांना सुरक्षित ठेवण्याचा प्लॅन ‘संकटमोचक’ डी. के. शिवकुमार यांनी राबवल्याचे स्पष्ट झाले आहे.

Congress
Chandrakant Patil News : मुलींना मोफत शिक्षण नाकारणारे कॉलेजेस राज्य सरकारच्या रडारवर : चंद्रकांत पाटील यांचा कडक इशारा

ओडिशामधील राज्यसभेच्या 4 जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे आणि या निवडणुकीत एकूण 5 उमेदवार रिंगणात आहेत. 147 सदस्यीय विधानसभेत बीजेडीकडे 48 आमदार आहेत, तर भाजपकडे 79 आमदार असून 3 अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com