UPSC Result Controversy : IPS असतानाही EWS कोटा? UPSC 2025 च्या निकालात नवीन ट्विस्ट; सोशल मीडियावर 'या' उमेदवाराची जोरदार चर्चा!

IPS officer EWS quota debate UPSC : UPSC 2025 च्या निकालानंतर नवा वाद समोर आला आहे. IPS असतानाही EWS कोट्याचा लाभ घेतल्याचा आरोप झाल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
UPSC Result Controversy : IPS असतानाही EWS कोटा? UPSC 2025 च्या निकालात नवीन ट्विस्ट; सोशल मीडियावर 'या' उमेदवाराची जोरदार चर्चा!
Published on
Updated on

यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा 2025 चा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर एक नवा वाद समोर आला आहे. या निकालात 9 वी रँक मिळवणाऱ्या आस्था जैन यांच्याबाबत सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि वापरकर्त्यांनी असा आरोप केला आहे की आस्था जैन यांनी आधी जनरल कॅटेगरीतून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस पद मिळवलं आणि त्यानंतर पुन्हा परीक्षा देताना EWC (Economically Weaker Section) कोट्याचा लाभ घेतला.

या आरोपांमुळे सोशल मीडियावर जोरदार वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी याला सिस्टीमचा गैरवापर असल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली आहे. मात्र सध्या तरी आस्था जैन यांच्यावर करण्यात येणाऱ्या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. या प्रकरणावर संघ लोक सेवा आयोगाकडून अधिकृत स्पष्टीकरण येण्याची प्रतीक्षा आहे.

UPSC Result Controversy : IPS असतानाही EWS कोटा? UPSC 2025 च्या निकालात नवीन ट्विस्ट; सोशल मीडियावर 'या' उमेदवाराची जोरदार चर्चा!
Pune-Pimpri Development Projects : पुणे-पिंपरीच्या वेगाला आता ब्रेक नाही! मुख्यमंत्र्यांचा मोठा शब्द, 'निधी कमी पडू देणार नाही'; नेमके कोणते प्रकल्प मार्गी लागणार?

या वादाची मूळ कारणं काय आहेत, याबाबतही विविध चर्चा सुरू आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की आस्था जैन यांनी 2024 मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत जनरल कॅटेगरीतून 186 वी रँक मिळवली होती. त्या निकालानंतर त्यांची आयपीएस पदासाठी निवड झाली. मात्र त्यानंतर 2025 मध्ये पुन्हा परीक्षा देताना त्यांनी EWC कॅटेगरीचा वापर केला, असा आरोप केला जात आहे.

यामुळे अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की एकदा सरकारी सेवेत निवड झाल्यानंतर एखादी व्यक्ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये कशी मोडू शकते. काही जणांच्या मते हा नियमांचा गैरफायदा असू शकतो, तर काही जणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र अधिकृत माहिती समोर येईपर्यंत या सर्व चर्चा केवळ सोशल मीडियापुरत्याच मर्यादित आहेत.

आस्था जैन या मूळच्या उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील आहेत. त्या साध्या कुटुंबातून पुढे आलेल्या उमेदवारांपैकी एक मानल्या जातात. उपलब्ध माहितीनुसार त्यांच्या वडिलांची एक छोटी किराणा दुकान आहे आणि त्यातूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

UPSC Result Controversy : IPS असतानाही EWS कोटा? UPSC 2025 च्या निकालात नवीन ट्विस्ट; सोशल मीडियावर 'या' उमेदवाराची जोरदार चर्चा!
Assembly Byelection : अजितदादा अन् शिवाजी कर्डिलेंचे उत्तराधिकारी कोण? बारामती, राहुरीतील पोटनिवडणुकीच्या घोषणेचा मुहूर्त ठरला

आस्था जैन यांनी 2024 च्या यूपीएससी परीक्षेत 186 वी रँक मिळवत आयपीएस पद मिळवलं होतं. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मेहनत घेत 2025 च्या परीक्षेत 9 वी रँक मिळवली. या रँकमुळे त्यांना आयएएस सेवेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र या यशाबरोबरच त्यांच्याभोवती निर्माण झालेला वाद सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com