Adhir Ranjan Chaudhari : अधीर रंजन चौधरींच्या निलंबनाचा होणार फैसला; विशेषाधिकार समिती करणार चर्चा

Sansad News : अधिवेशनात चार खासदारांचे निलंबन केले
Adhir Ranjan Chaudhari
Adhir Ranjan ChaudhariSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : मणिपूर घटनेचा संदर्भ देत लोकसभेत विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अविश्वास ठरावाच्या चर्चेत सडकून टीका केली होती. चौधरींच्या वक्तव्यावरून भाजपचे सदस्य आक्रमक झाल्याने संसदेत गदारोळ झाला होता. मोदींवर केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे चौधरींना निलंबित करण्यात आले होते. भाजपने केलेल्या कारवाईनंतर विरोधी पक्ष आक्रमक झाल्याने चौधरींच्या निलंबनाबाबत शुक्रवारी विशेषाधिकार समिती चर्चा करणार आहे. चौधरींवरील कारवाईबाबत होणाऱ्या समितीच्या निर्णयाकडे देशाचे लक्ष आहे. (Latest Political News)

Adhir Ranjan Chaudhari
Senate Election News : निवडणूक स्थगितीसाठी 'पहाटेचा मुहूर्त' शोधला नाही? अमित ठाकरेंचा सरकारला खोचक टोला !

पावसाळी अधिवेशनवेळी लोकसभेत १० ऑगस्टला चौधरी यांना निलंबित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपाने नीरव मोदी देशातच राहतात, या टिप्पणीमुळे त्यांना निलंबित केले होते. चौधरींच्या निलंबनानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाला होता. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन त्यांच्या निलंबनाबाबत चर्चा करीत नाराजी व्यक्त केली होती. त्यांनतर सोनिया गांधी यांनी लोकसभेतील काँग्रेस खासदारांची बैठक बोलवली होती.

Adhir Ranjan Chaudhari
INDIA Alliance Meeting in Mumbai: महाविकास आघाडीच्या 'या' पाच समित्या करणार 'इंडिया'चा पाहुणचार

Adhir Ranjan Chaudhari चौधरींवर केलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे विरोधी पक्षाच्या खासदारांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यातूनच सत्ताधारी पक्षांनी नमती भूमिका घेत विशेषाधिकार समिती स्थापन केली होती. ही समिती शुक्रवारी याबाबत चर्चा करणार आहे. या बैठकीत चौधरी यांच्या निलंबनाबाबत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशन काळात लोकसभेत गोंधळामुळे दोन खासदारांना निलंबित केले करण्यात आले, तर राज्यसभेतीलही दोन खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com