INDIA Alliance Meeting in Mumbai: महाविकास आघाडीच्या 'या' पाच समित्या करणार 'इंडिया'चा पाहुणचार

Mumbai Meeting : 'इंडिया' आघाडीतील नेतेमंडळींची येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुंबईत बैठक होत आहे.
INDIA Alliance
INDIA AllianceSarkarnama

Mumbai News : सत्ताधारी भाजपच्या विरोधात मुंबईत एकवटणाऱ्या विरोधी पक्षांच्या (इंडिया) तील नेत्यांच्या पाहुणचारासाठी महाविकास आघाडीने जय्यत तयारी केली आहे. मुंबईत दोन दिवसांच्या मुक्काम ठोकणाऱ्या सर्व विरोधी नेत्यांच्या पाहुणचारासाठी महाविकास आघाडीने विशेष पाच समित्या नेमूण बड्या नेत्यांची नियुक्ती केली आहे. या समित्या मुंबईत येणाऱ्या पाहुण्यांच्या पाहुणचाराची सर्व व्यवस्था पाहणार आहेत.

'इंडिया' आघाडीचे नेतेमंडळींची येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुंबईत बैठक होत आहे. या समितीत महविकास आघाडीलातील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गट अशा प्रत्येक पक्षातील दोन ते तीन सदस्यांची एक समिती अशा पाच समित्या नेमण्यात आल्या आहेत. या समित्यांवर पाहुणे आणि महाविकास आघाडीत समन्वय साधण्याची जबाबदार देण्यात आली आहे.

INDIA Alliance
Baramati Lok Sabha Review Meeting : उद्धव ठाकरेंचेही ‘मिशन बारामती’; मतदारसंघ भाजपकडे जाऊ न देण्यासाठी विशेष रणनीती

१. प्रोटोकॉल समिती : दुसऱ्या राज्यातून येणारे मुख्यमंत्री, मंत्री, पक्ष प्रमुखांचे स्वागत आणि निरोप, त्यांचे विमानतळ ते हॉटेलपर्यंत योग्य व्यवस्था आणि महाविकास आघाडी आणि पाहुण्यांमध्ये समन्वय राखण्याचे काम ही समिती करणार आहे.

२. फूड समिती : दोनदिवसीय बैठकीसाठी येणाऱ्या पाहुण्यांचे चहापान, नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण इ. कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत येणारे नेते आणि त्यांच्या सहकारी स्टाफच्या खानपानाची व्यवस्था करण्याची जबाबदारी फूड समितीवर असणार आहे. (India Alliance)

INDIA Alliance
Kolhapur Mahapalika News : 'दादा आयुक्त पाठवून द्या': आप'ने अजित पवारांना करून दिली आश्वासनाची आठवण

३. स्वागत समिती : येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करणे पाहुण्यांना हॉटेलपर्यंत पोहोचवण्याचे काम ही समिती करणार आहे. (INDIA Alliance)

४. राहण्याची सोय समिती : बाहेरच्या राज्यातून येणारे मुख्यमंत्री,मंत्री ,नेते त्यांचा स्टाफ यांच्या राहण्याची व्यवस्था, त्यांना वाहन उपलब्ध करून देणे, ही सोय पाहण्यासाठी ही समिती काम करेल.

५. मीडिया समिती : बैठकीसाठी येणारे प्रसार माध्यमे, माध्यमांचे प्रतिनिधी आणि त्यांचे नियोजन करण्यासाठीही समिती असणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com