नितीन राऊतांना मोठा धक्का; काँग्रेसनं पद घेतलं काढून!

बैठकीमध्ये नागपूर निवडणुकीच्या पराभवाची विचारना राऊत यांना करण्यात आल्याची चर्चा होती.
 Nitin Raut 

 Nitin Raut 

sarkarnama

Published on
Updated on

नवी दिल्ली : काँग्रसेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांना पक्षाने मोठा धक्का दिला आहे. राऊत यांची काँग्रेसच्या (Congress) अनुसूचित जाती विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन गच्छती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राजेश लिलौठिया यांना संधी देण्यात आली आहे. या संदर्भात काँग्रेसने ट्वीट केले आहे. राऊत यांचा ३ वर्षांचा कार्यकाळ संपला आहे.

<div class="paragraphs"><p>&nbsp;Nitin Raut&nbsp;</p></div>
विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव पुन्हा चर्चेत

त्याच बरोबर के राजू यांची SC/OBC/ अल्पसंख्याक विभाग आणि अखिल भारतीय आदिवासी विभागाच्या सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राऊत यांची काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशावरुन गच्छती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच पक्षाने नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नितीन राऊत आणि पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना समन्स बजावले होते.

त्यानंतर या नेत्यांनी दिल्ली वारीही केली होती. या बैठकीमध्ये नागपूर निवडणुकीच्या पराभवाची विचारना राऊत यांना करण्यात आल्यीच चर्चा होती. त्या बैठकीनंतर राऊत प्रसारमाध्यमांशी काही न बोलता निघून गेले होते. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची मंत्रीमंडळात वर्ण लागणार असल्याची चर्चा आहे.

<div class="paragraphs"><p>&nbsp;Nitin Raut&nbsp;</p></div>
काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेवर अखेर हरभजनसिंग म्हणाला...

त्यातच पटोले यांना नितीन राऊत यांचे ऊर्जा खाते मिळणार असल्याचे सांगितले जात होत. त्यावरुन गेल्या अनेक दिवसापासून नाना पटोले आणि नितीन राऊत यांच्यात पक्षांतर्गत वाद असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांंना कोणत्याही पक्षाच्या पदावर राहता येत नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदी राऊत यांची नियुक्ती होणार असल्याचीही चर्चा सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com