
Bihar Congress news : काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडून बिहारमध्ये जिल्हा समितींचे सदस्य होण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीत तिकीटांसाठीच्या दावेदारीसाठी जी अट ठरवण्यात आली आहे, त्यामुळे जुन्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह विद्यमान आमदारांमध्येही अस्वस्थता वाढली आहे.
काँग्रेस पक्षाच्या आदेशानुसार, निवडणुकीसाठीच्या तिकीटाचा खरा दावेदार त्यालाच मानलं जाईल, ज्याचे फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्स प्लॅटफॉर्मवरील फॉलोअर्सची संख्या चांगल्याप्रमाणात असेल. विशेष म्हणजे या तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील फॉलोअर्सची संख्याही वेगवेगळी निर्धारित केली गेली आहे.
फेसबुकवर किमान एक लाख 30 हजार, एक्स हॅण्डलरवर 50 हजार आणि इंस्टाग्रामवर किमान 30 हजार फॉलोअर्स ज्याचे असतील त्याच्याच दावेदारीवर विचार केला जाणार आहे. तसेच जिल्हा समितींच्या दावेदारीसाठीही हाच निकष असणार आहे. बिहारमध्ये याच वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.
जर अटी लागू केल्या गेल्या तर बिहारमधील सर्व आमदारांना, ज्यात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष यांचाही समावेश आहे, या सर्वांना तिकीट नाकारले जाऊ शकते. अन्य दावेदारांसाठी तर आणखीच अवघड होईल. ७ एप्रिल रोजी जेव्हा राहुल गांधी बिहारच्या दौऱ्यावर होते, तेव्हा सेंट्रल वॉर रूमचे अध्यक्ष आणि माजी आयएएस शशिकांत सेंथील यांनी बिहार काँग्रेस नेत्यांना हे अशक्य लक्ष्य दिले होते.
सेंथील यांनी पाटणा येथील सदाकत आश्रमात हे लक्ष्य प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह जिल्हाध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत एका प्रेझेंटेशनच्या माध्यामातून दिले. तसेच यावेळी मार्गही सांगितले की तिकीटासाठी असलेला दावेदार कशाप्रकार आपल्या फॉलोअर्सची संख्या वाढवू शकतो. याचबरोबर यामध्ये काही अडचण आल्यास सेंथील यांनी एक फोन नंबरही जारी केला आहे. आता या नवीन अटीमुळे काँग्रेसमधील इच्छुकांचे टेन्शन वाढले आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.