Congress And BJP News : काँग्रेसचा भाजपला मोठा झटका; धर्मांतर विरोधी कायदा रद्दचा निर्णय

Karnataka Government Cancel Law : सावरकर, हेगडेवार यांच्यासंबंधित पाठ्यपुस्तकातील धडे वगळले
Siddaramaiah, Basavraj Bommai
Siddaramaiah, Basavraj BommaiSarkarnama
Published on
Updated on

Congress Cancel Law Of BJP : कर्नाटकमध्ये एकहाती सत्ता स्थापन केल्यानंतर काँग्रेसने भाजपने केलेले कायदे बदलण्याचे सुतोवाच केले होते. त्यास काँग्रेसने सुरुवात केली आहे. पूर्वीच्या भाजप सरकारने कर्नाटकमध्ये धर्मांतर विरोधी कायदा केला होता. तो कायदाच आता सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबतचा ठराव राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी (ता. १५) मंजूर केला. तसेच बाजार समितीचा नवीन याबाबत राज्याचे कायदा व संसदीय कामकाज मंत्री एच.के. पाटील यांनी माहिती दिली. या निर्णयाने काँग्रेसने भाजपला मोठा झटका दिल्याचे बोलले जात आहे. (Latest Marathi News)

Siddaramaiah, Basavraj Bommai
Sharad Pawar Criticized Shivsena: 'त्या' जाहिरातीच्या माध्यमातून सरकारचं ऐतिहासिक काम समजलं; शरद पवारांचा राज्य सरकारला टोला

तत्कालीन भाजप सरकारने धर्मांतर विरोधी कायद्याची आधी अध्यादेशाद्वारे अंमलबजावणी केली होती. त्यानंतर हा कायदा सभागृहात आणला होता. या कायद्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये संघर्ष झाला होता. काँग्रेसने या कायद्याला अल्पसंख्याकांवर अत्याचार करण्याचे हत्यार म्हटले होते. त्यावेळी सिद्धरामय्यांनी भाजपवर सडकून टीका केली होती.

सिद्धरामय्या (Siddaramaiah) म्हणाले होते की, "आमचा कायदा प्रलोभन आणि धमक्यांद्वारे जबरदस्तीने होणारे धर्मांतर रोखण्यास सक्षम आहे. त्यामुळे नव्या कायद्याची गरज काय? या कायद्याच्या माध्यमातून भाजपचा अल्पसंख्याकांना धमकावणे आणि त्रास देणे हा एकच उद्देश आहे."

दरम्यान, या धर्मांतरविरोधी कायद्याच्या निषेधार्थ काही संघटनांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात ख्रिश्चन संघटनांनी नवीन कायदा घटनेने हमी दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करत असल्याचा युक्तीवाद केला होता.

Siddaramaiah, Basavraj Bommai
Supriya Sule On Ajit Pawar: सुप्रियाताई म्हणतात, "अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन,"

सावरकर, हेडगेवार यांच्यासंबंधित प्रकरणे काढली

शालेय इतिहासाच्या पुस्तकातून के.बी.हेडगेवार आणि विनायक दामोदर सावरकर यांच्याशी संबंधित प्रकरणे काढून टाकण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. के.बी.हेडगेवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक होते. त्यांच्याशी संबंधित प्रकरणे गेल्या वर्षी पुस्तकांमध्ये जोडण्यात आली होती.

एच. के. पाटील (H.K. Patil) म्हणाले की, "राष्ट्रीय स्वयंसवेक संघाला वैचारीक अधिष्ठान देणाऱ्या सावरकर आणि हेडगेवार यांच्यावरील असलेला धडाही काढून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. या दोघांवरील धडा मागच्यावर्षी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला होता. याशिवाय भाजपने अभ्यासक्रमात जे जे बदल केले आहेत, ते हळूहळू वगळण्यात येणार आहेत. तर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्तोत्रांसह संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन बंधनकारक करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे."

Siddaramaiah, Basavraj Bommai
Shasan Aplya Dari News: 'शासन आपल्या दारी' हा राज्य शासनाचा उपक्रम आमदार, खासदारांकडून `हायजॅक`

कृषी बाजारासाठी नवीन कायदा

सिद्धरामय्या मंत्रिमंडळाने कृषी बाजारांवर (APMC) नवीन कायदा आणण्याचा निर्णयही घेतला आहे. गेल्या महिन्यात काँग्रेसने (Congress) कर्नाटकात भरघोस जनादेश मिळवून विजय मिळवला होता. त्यानंतरच नवे सरकार मागील भाजप सरकारच्या धोरणांचा आढावा घेणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले होते. त्यानुसार काँग्रेस आता धर्मांतर विरोधी कायदा, हिजाब बंदी, मुस्लीम आरक्षण रद्द करणे अशाप्रकारचे निर्णय बदलणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com