Shasan Aplya Dari News: 'शासन आपल्या दारी' हा राज्य शासनाचा उपक्रम आमदार, खासदारांकडून `हायजॅक`

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवडमधील थेरगावात आज दुपारी दाखले वाटप केले जाणार आहे.
Shasan Aplya Dari News:
Shasan Aplya Dari News:Sarkarnama
Published on
Updated on

PCMC Politics: केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक दाखले एकाच छताखाली देण्यासाठी 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम राज्य शासनाने सुरु केला आहे. मात्र,तो आमदार,खासदारांनीच `हायजॅक` केला आहे.त्याचा लाभ जणूकाही आपणच मिळवून देत आहोत,असा आव ते दाखवित आहेत.

वरील उपक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवडमधील थेरगावात आज दुपारी दाखले वाटप केले जाणार आहे. त्याची माहिती शिवसेनेचे (शिंदे) खासदार श्रीरंग बारणे यांनी काल पत्रकारपरिषद घेऊन दिली. तर, दुसरीकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही त्याबाबत प्रसिद्धीपत्रक काढून ही माहिती कालच दिली.

Shasan Aplya Dari News:
Chandrashekhar Bawankule News : ‘हे’ उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? त्यांनी लंडनमधून व्हिडिओ पाठवावा !

खा. बारणेंच्या निवासस्थानाजवळ हे दाखले वाटप केले जाणार आहे.राज्यातील शिंदे-फडणवीस (Shinde- Fadanvis Govt) सरकारला 30 जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त सरकारच्या माध्यमातून शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन राज्यभरात करण्यात येत आहे. मात्र, जणू काही आपणच हा उपक्रम घेत असून त्याचा लाभ देत आहोत,य़ा थाटात त्याचे आयोजन आमदार, खासदाराकंडून सुरु आहे.त्यामुळे या श्रेयबाजीची खमंग चर्चा आहे.

शासन आपल्या दारी या राज्य शासनाच्या उपक्रमाअंतर्गत थेरगावातील दाखले वाटप कार्यक्रम पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने होत असल्याचे महापालिकेने काल स्पष्ट केले. महापालिका स्तरावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यात महापालिकेच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांच्या लाभांचे वितरणही केले जाणार आहे.असे पालिकेने म्हटले आहे.

Shasan Aplya Dari News:
Congress And BJP News : काँग्रेसचा भाजपला मोठा झटका; धर्मांतर विरोधी कायदा रद्दचा निर्णय

'जेएनएनयुआरएम' योजनेअंतर्गत महापालिकेच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या घरकुल योजनेत २५२ सदनिका वाटप यावेळी करण्यात येणार आहे.पालिकेच्या वतीने निगडी येथे उभारण्यात आलेल्या श्री महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे अनावरणही सायंकाळी मुख्यमंत्रीच करणार असल्याचे पालिकेने कळवले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com