कट्टर विरोधक असलेल्या भाजप सरकारला काँग्रेसचा पाठिंबा अन् टीकेचा भडिमार

काँगेसनं हे धक्कादायक पाऊल उचलत केवळ विकासाच्या मुद्यावर पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे.
BJP, Congress
BJP, Congress

Sarkarnama

Published on
Updated on

नवी दिल्ली : देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून (Congress) दररोज भाजपवर (BJP) जोरदार प्रहार केला जातो. विविध राज्यांमध्ये असलेल्या भाजप सरकारसह मोदी सरकारवर (Modi Government) काँग्रेसचे नेते तुटून पडतात. पण राजकारणात (Politics) काहीही होऊ शकतं, असं म्हणतात. ते काँग्रेसनं पुन्हा एकदा खरं करून दाखवलं आहे. मेघालयमध्ये काँग्रेसने या भूमिकेलाच हरताळ फासल्याचे स्पष्ट झाले आहे. मेघालयमधील भाजपच्या आघाडी सरकारला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. वरिष्ठ नेत्यांकडूनही त्याचे समर्थन केले जात असल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

मेघालयमध्ये (Meghalaya) भाजप व नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) या पक्षांची आघाडी असून त्यांची सत्ता आहे. पण दोन टोकं असलेल्या भाजप व काँग्रेसनं या राज्यात जुळवून घेतलं आहे. भारतीय राजकारणात पहिल्यांदाच भाजप व काँग्रेस एकत्र आले आहेत. काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांनी 17 आमदारांसह काँग्रेसला रामराम ठोकत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. परिणामी, काँग्रेसऐवजी आता तृणमूल प्रमुख विरोधी पक्ष आहे.

BJP, Congress
धक्कादायक : महिला सरपंचावरच आली भीक मागून जगण्याची वेळ

राज्यात झालेली ही उलथापालथ आणि संगमा व तृणमूलला शह देण्यासाठी काँग्रेसनंही हे ऐतिहासिक पाऊल उचलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज्यातील नेत्यांकडून हा पाठिंबा केवळ विकासाच्या मुद्यांवर देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मेघालयचे प्रभारी मनीष तिवारी (Manish Tiwari) यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. राज्यात काँग्रेस राहील आणि विरोधी पक्षाची भूमिकाही पार पाडेल. सरकारला दिलेला पाठिंबा हा राज्यातील विकासाच्या मुद्यांवर आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेसकडे सध्या केवळ पाच आमदार आहे. शुक्रवारी त्यांची बैठक झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री कोनराड संगमा यांची भेट घेत विकासाच्या मुद्यावर पाठिंबा जाहीर केला. या आघाडीनंतर मुकुल संगमा (Mukul Sangma) यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, राज्यात काँग्रेसची लक्तरं झाल्याचेच हे चित्र आहे. भाजपची साथ असलेल्या सत्तारूढ पक्षासोबत जात काँग्रेसने विरोधकांचा विश्वासघात केला आहे.

BJP, Congress
मुलीचं लग्न साध्या पद्धतीनं, पण, रिसेप्शन गोव्यात ; टीकेला आव्हाडांनी दिलं उत्तर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनीही काँग्रेसला टोला लगावला आहे. मेघालयमध्ये काँग्रेस आणि भाजप एकाच सरकारमध्ये आहेत का, असा सवाल त्यांनी केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अम्पारेन लिंगडोह म्हणाले, सर्वसामान्य जनतेशी संबंधित मुद्यांवरह सरकारला पाठिंबा असेल. सरकार आणि विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्यांना या मुद्यांवर मार्ग करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करू, असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com