दे धक्का! भाजपमधून सहाच दिवसांत घरवापसी करणाऱ्या आमदाराचा पत्ता कट

पंजाबमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज 86 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
BJP and Congress
BJP and Congress Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये (Punjab) फोडाफोडीचे राजकारण पेटले आहे. भाजपने ((BJP) काँग्रेसचे (Congress) आमदार बलविंदरसिंग लड्डी (Balwinder Singh Laddi) यांना फोडले होते. परंतु, काँग्रेसने भाजपला धोबीपछाड सहाच दिवसांत त्यांची घरवापसी केली होती. आता याच लड्डी यांचे तिकिट कापून काँग्रेसने त्यांना मोठा धक्का दिला आहे.

काँग्रेसने आज जाहीर केलेल्या 86 उमेदवारांच्या यादीत मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी हे राखीवन चमकौर साहिब मतदारसंघातून मैदानात उतरणार आहेत. यादीत प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (अमृतसर पूर्व), प्रतापसिंग बाजवा (काडियन), सुखजिंदरसिंग रंधावा (डेरा बाबा नानक), परगतसिंग (जालंधर कॅन्टोन्मेंट) या बड्या नेत्यांचा समावेश आहे.

हरगोविंदपूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार लड्डी यांचे तिकिट काँग्रेसने कापले आहे. लड्डी यांच्यासह चार आमदारांनी मागील महिन्यांत भाजपमध्ये प्रवेश केला होता. नंतर सहाच दिवसांत ते काँग्रेसमध्ये परतले होते. ते हरगोविंदपूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. हा मतदारसंघ राखीव असून, लड्डी यांना उमेदवारीत त्यांना डावलले आहे. या मतदारसंघातून त्यांना मनदीपसिंग रंगार नांगल यांना तिकिट देण्यात आले आहे.

BJP and Congress
पंजाबमध्ये पुन्हा एकदा सिद्धू विरुद्ध कॅप्टन थेट सामना

भाजपला धक्का देत काँग्रेसने लड्डी यांना पुन्हा आपल्याकडे ओढून घेतले होते. लड्डी यांनी काँग्रेसचे पंजाब प्रभारी हरीश रावत आणि उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा यांच्या उपस्थितीत पक्षात घरवापसी केली होती. लड्डी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या स्वागताचे संदेश सोशल मीडियावर येत होते. हे संदेश थांबण्याआधी लड्डी हे काँग्रेसमध्ये परतले होते. ते परतल्याने राज्यातील भाजप तोंडावर पडल्याचे चित्र होते. आता याच लड्डींना काँग्रेसकडून डावलण्यात आले आहे.

BJP and Congress
भाजप नेत्यांना पक्षात प्रवेश नाही! अखिलेश यादवांची मोठी घोषणा

राज्यात 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले होते. काँग्रेसने 117 पैकी 77 जागा मिळवत अकाली दल व भाजप आघाडीच्या ताब्यात सत्ता काबीज केली होती. हे दोन्ही पक्ष सलग 10 वर्षे राज्यात सत्तेत होते. या निवडणुकीत आप 20 जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता, तर अकाली दलाला 15 आणि भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com