Eknath Shinde Politics : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची जादू चालली! ठाकरे बंधूंचा पराभव! भाजपलाही धक्का!

Eknath Shinde Uddhav Thackeray Sporting Club Election : भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिलेदांमध्ये युती झाली मात्र ते एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला पराभूत करू शकले नाहीत.
Raj Thackeray, Eknath Shinde, Uddhav Thackeray
Raj Thackeray, Eknath Shinde, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

राहुल क्षीरसागर

Thane Politics : ठाण्यातील १०० वर्षे जुन्या स्पोर्टींग क्लब कमिटीच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेविरुद्ध भाजप, शिवसेना उद्ध बाळासाहेब ठाकरे पक्ष , मनसे असा सामना रंगल्याचे चित्र होते. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपा‌ळे यांच्या स्पोर्टिंग क्लब पॅनलने नऊपैकी पाच जागांवर विजय मिळवत बाजी मारली. तर, भाजपचे माजी नगरसेवक डाॅ. राजेश मढवी यांच्या स्पोर्टींग कार्यशील पॅनेलला चार जागांवर विजय मिळला .

मुंबई क्रिकेट संघटनेला संलग्न असलेल्या शतायुषी स्पोर्टींग क्लब कमिटीची त्रैवार्षिक निवडणूक शुक्रवार १९ सप्टेंबरला सेंट्रल मैदावरील क्लबच्या सभागृहात पार पडली. या निवडणुकीत १८ उमेदवार उभे होते. तर, क्लबचे १५७ सदस्य मतदार आहेत. या निवडणुकीसाठी सुरुवातीला २४ उमेदवारांनी आपले निवडणुक अर्ज दाखल केले होते. परंतु नावे मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले होते.

विसर्जित कार्यकारिणीतील ९ पैकी ८ सदस्य पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. स्पोर्टींग कार्यशील पॅनेलमधून भाजपचे माजी नगरसेवक डाॅ. राजेश मढवी, ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी सचिन गोरीवले, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे हे एकत्रितपणे निवडणुक लढवित होते. त्याच्याविरोधातील स्पोर्टींग क्लब पॅनलमधून शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि माजी परिवहन सभापती विलास जोशी हे निवडणुक लढवत होते. त्यांच्या पॅनलमधून यापुर्वी भाजपचे पदाधिकारी प्रशांत गावंड यांनी निवडणुक लढविले होती. मात्र, अचानकपणे त्यांनी माघार घेतली होती. यामुळे या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेविरुद्ध भाजप, उबाठा, मनसे असा सामना रंगल्याचे चित्र होते.

Raj Thackeray, Eknath Shinde, Uddhav Thackeray
Shubhangi Patil Politics: शुभांगी पाटील यांचा आरोप, ‘भाजप नेते नाव रामाचे घेते, काम रावणाचे करतात’

१४३ सदस्यांनी केले मतदान

दरम्यान, संस्थेच्या एकूण १५८सदस्यांपैकी १४३ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. अकरा सदस्य गैरहजर राहिले तर तीन मते बाद झाली. मतदान करणाऱ्यांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी खासदार राजन विचारे, डॉ संजीव नाईक यांचा समावेश होता.

विरोधकांना बरोबर घेणार...

या अटीतटीच्या निवडणुकीत स्पोर्टिंग क्लब पॅनेलचे माजी परिवहन सभापती विलास जोशी, माजी शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, ॲड कैलास देवल, श्रावण तावडे आणि किरण साळगावकर निवडून आले. तर मावळत्या कार्यकारिणीतील माजी अध्यक्ष डॉ. राजेश मढवी, सचिव दिलीप धुमाळ, अतुल फणसे, डॉ योगेश महाजन यांनी आपल्या जागा कायम राखल्या.

स्पोर्टिंग क्लब पॅनलचे विकास रेपाळे यांनी सांगितले की, स्पोर्टिंग क्लब कमिटी ही ठाण्यातील क्रिकेट खेळातील अग्रगण्य संस्था आहे. ठाण्याच्या क्रिकेटमध्ये संस्थेचे भरीव योगदान आहे. पुढील वाटचालीत विरोधकांनाही बरोबर घेऊन ठाण्याचे क्रिकेट आणि सेंट्रल मैदानाच्या विकासासाठी काम करणार आहे.

Raj Thackeray, Eknath Shinde, Uddhav Thackeray
Bacchu Kadu Politics: बच्चू कडू यांनी आव्हान स्वीकारले, थेट गुलाबराव पाटील यांच्या घरीच जाणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com