Prakash Javadekar : "सलग पराभवामुळेच..."; भाजप खासदारांना धक्काबुक्की अन् 'ईव्हीएम'च्या मुद्द्यावरून जावडेकरांनी राहुल गांधींना धुतलं

BJP vs Congress Parliament incident : "गेले पंधरा वर्षे जनतेने काँग्रेसला नाकारल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि कार्यकर्ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. या रागापोटीच त्यांनी भाजप खासदारांना धक्काबुक्की केली. त्यावर स्वतःची चूक मान्य न करता धक्काबुक्कीने काहीही होत नाही, असं स्पष्टीकरण राहुल गांधींनी दिलं आहे."
Prakash Javadekar | Rahul Gandhi
Prakash Javadekar | Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 20 Dec : गेले पंधरा वर्षे जनतेने काँग्रेसला नाकारल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि कार्यकर्ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. या रागापोटीच त्यांनी भाजप खासदारांना धक्काबुक्की केली. त्यावर स्वतःची चूक मान्य न करता धक्काबुक्कीने काहीही होत नाही, असं स्पष्टीकरण राहुल गांधींनी दिलं आहे.

मात्र, त्यांची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कोल्हापुरात दिला आहे. देशातील सुज्ञ जनतेने काँग्रेसला सलग पंधरा वर्षे सत्तेबाहेर बसवलं आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर येऊ नये यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले.

मात्र, जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सरकारला कौल दिला. पंधरा वर्षे सत्तेबाहेर बसल्याने काँग्रेस आणि त्यांचे घटक पक्ष वैफल्यग्रस्त झाले आहेत. या रागातूनच त्यांनी संसद परिसरात खासदार सारंगी यांना धक्काबुक्की केली. असं सांगत माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

Prakash Javadekar | Rahul Gandhi
Kalyan Crime : "मराठी माणसं भिकारी...", म्हणत कल्याणमध्ये परप्रांतीयाकडून मराठी रहिवाशांना मारहाण, VIDEO व्हायरल

तर, ईव्हीएमवर बोलताना ते म्हणाले, देशातील जनता ही सुज्ञ आहे. पाच वर्षाच्या राजकारणात मी प्रत्येक निवडणुकीत अनुभव घेतलेला आहे. ज्या ईव्हीएमवर ते लोकसभा निवडणूक जिंकले. त्याच ईव्हीएम बद्दल विधानसभेत पराभव झाल्यानंतर वाईट बोलत आहेत.

Prakash Javadekar | Rahul Gandhi
Santosh Deshmukh Murder Case : आरोपींचा एन्काऊंटर करा; 51 लाख अन् पाच एकर जमीन बक्षीस, मुख्य सूत्रधाराला अटक केल्यास...

कर्नाटकात ज्या ईव्हीएमवर विजयी झाले ते ईव्हीएम चांगले. आणि महाराष्ट्रात पराभव झाला ते ईव्हीएम वाईट, काँग्रेसचा (Congress) ईव्हीएमवरील आरोप म्हणजे हास्यास्पद असल्याचंही जावडेकर म्हणाले. 1999 ला महाराष्ट्रात ही लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र झाली होती. ओडीसा आणि आंध्र प्रदेशमध्ये आजही लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होतात. त्यामुळे एक देश एक निवडणुकीला विरोध करणे योग्य नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com