Congress News : ना जात पर, ना पात पर..! इंदिरा गांधींच्या घोषणेची आठवण अन् राहुल गांधींवर निशाणा

Anand Sharma News : निवडणुकीच्या तोंडावरच आनंद शर्मा यांनी नाराजी व्यक्त केल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलित मिळाले आहे. त्यामुळे आता जातीवर आधारित जनगणनेचा मुद्दा काँग्रेसलाच अडचणीत आणू शकतो.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना काँग्रेसची (Congress News) डोकेदुखी वाढली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी थेट राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. जातीवर आधारित जनगणना म्हणजे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव यांच्या विचारांचा अनादर असल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे. शर्मा यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान (Bharat Jodo Nyay Yatra) सातत्याने जातीवर आधारित जनगणनेचा मुद्दा मांडला. सत्तेत आल्यास देशभरात जातीवर आधारित जनगणना केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. त्यानंतर शर्मा (Ananad Sharma) यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना पत्र लिहून यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Rahul Gandhi
Lok Sabha Election 2024 : अखिलेश यांची मोठी घोषणा; ‘इंडिया’ला धक्का, आणखी एक पक्ष बाहेर

शर्मा यांनी इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या ‘ना जात पर ना पात पर, मुहर लगेगी हाथ पर’, या घोषणेची आठवण करून देताना म्हटले आहे की, पक्षाच्या सध्याच्या भूमिकेचा काँग्रेसच्या मागील सरकारच्या विचारांसोबत मेळ बसत नाही. त्यामुळे विरोधकांना पक्षावर टीका करण्याची संधी मिळेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजीव गांधींच्या 1990 मधील भाषणाचा हवाला देताना शर्मा यांनी पत्रात म्हटले आहे की, राजीव गांधी यांनी त्यावेळी लोकसभेत म्हटले होते, लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमध्य जातीवाद हा एक मुद्दा बनवला जात असेल तर आमचा विरोध असेल. अशा स्थितीत काँग्रेस देशाचे विभाजन होत असताना पाहू शकत नाही.

जातीवर आधारीत जनगणना हा कशावरही रामबाण उपाय नाही. त्यामुळे बेरोजगारी दूर होणार नाही. प्रचलित असमानताही दूर होणार नाही, असे म्हणत शर्मांनी थेट विरोधाचे बाण सोडले आहेत. शर्मा यांनी यापूर्वीही काँग्रेसच्या काही धोरणांवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. पण या वेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत थेट राहुल (Rahul Gandhi) यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.

R

Rahul Gandhi
CJI Dhananjay Chandrachud News : …हा तर कोर्टाचा अवमान! सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी राज्यपालांना फटकारले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com