Congress On AAP And Trinamool Congress : 'केजरीवाल - ममतांचा पक्ष भाजपच्या ‘बी’ टीम, अंजली निंबाळकरांचा हल्लाबोल

Congress leader Anjali Nimbalkar : आगामी 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपची बी टीम म्हणून आम आदमी आणि तृणमूल काँग्रेस काम करत असल्याचा आरोप गोवा काँग्रसेने केला आहे.
mamata banerjee And arvind kejriwal
mamata banerjee And arvind kejriwalsarkarnama
Published on
Updated on

Panaji News : 2027 मध्ये गोव्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी भाजपसह सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. आता आम आदमी आणि तृणमूल काँग्रेसने देखील शड्डू ठोकला असून ते देखील निवडणुकीची तयारी करत आहेत. यावरून गोवा काँग्रेसने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर आम आदमी आणि तृणमूल काँग्रेस भाजपची बी टीमप्रमाणे काम करत असल्याची दावा केला आहे. यामुळे कधीकाळी इंडिया आघाडीचे पक्ष असणारे पक्ष आता एकमेंकासमोर आले आहेत.

महिला काँग्रेसच्या प्रभारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी विधानसभेच्या निवडणुकीवरून आम आदमी आणि तृणमूल काँग्रेस तोफ डागली आहे. निंबाळकर यांनी, केवळ गोव्यात येऊन भाजपसाठी जे काम करतात, ते आम आदमी आणि तृणमूल काँग्रेस पक्षाने दाखवून दिले आहे. त्यामुळे 2027 च्या निवडणुकीत या पक्षांनी उतरूच नये, असा सल्ला दिला आहे. त्या महिला काँग्रेसच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होत्या.

यावेळी त्या पुढे म्हणाल्या, 2022 च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षांनी काँग्रेसचे मोठे नुकसान केले. भाजपच्या ‘बी’ टीमसारखे दोन्ही पक्षाचे काम होते आणि आजही सुरू आहे. त्यामुळे आताही हे दोन्ही पक्ष तेच करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत उतरून हे दोन्ही पक्ष भाजपलाच एकप्रकारे मदत करणार आहेत. 2022 च्या निवडणुकीनंतर टीएमसीवाल्यांनी तर कार्यालयास कुलूपही लावले असे म्हणत घणाघात केला आहे.

mamata banerjee And arvind kejriwal
Congress leader trouble : काँग्रेसच्या बड्या नेत्याचे टेन्शन वाढले; आमदारकी धोक्यात? कोर्टाने बजावला समन्स

तसेच निंबाळकर यांनी, आपचे आमदार निवडून आले आहेत. पण त्यांचे प्रदेशाध्यक्ष (अमित पालेकर यांचे नाव न घेता) दिल्लीच्या निवडणुकीनंतर काँग्रेसवर टीका करत आहेत. तुम्ही तुमचे घर सांभाळा, आम्ही आमचं बघू, असा सल्लाही आपला दिला आहे.

mamata banerjee And arvind kejriwal
Congress Politics: वादग्रस्त निर्णयांचा सपाटा; दिल्लीतून काँग्रेसच्या कुणाल राऊतांना 'जोर का झटका'; 48 तासांतच 'तो' निर्णय रद्द

दिल्लीला तुमची गत काय झाली आहे. तशीच गत तुम्हाला गोव्यातही करून घ्यावयाची आहे? असा सवाल करताना निंबाळकर यांनी, तुमची तशी इच्छा असेल तर आम्ही स्वागत करतो. आपबरोबर जनमत राहिलेले नाही. गोव्यात लोकांचा आशीर्वाद काँग्रेसबरोबर राहिल्याचेही निंबाळकर म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com