Congress : काँग्रेसला डबल झटका; देवरांआधी मोठ्या नेत्यानं दिला पदाचा राजीनामा

Apurba Kumar Bhattacharjee : काँग्रेसचे प्रवक्ते अपूर्व भट्टाचार्य यांनी दिला पदाचा राजीनामा...
Apurba Kumar Bhattacharjee, Milind Deora
Apurba Kumar Bhattacharjee, Milind DeoraSarkarnama
Published on
Updated on

Political News : काँग्रेसला दोन दिवसांत दोन मोठे झटके बसले आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला आजपासून सुरूवात असतानाच दोन नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील नेत्यांमधील नाराजी आता उफाळून येऊ लागली आहे. त्यावरून भाजप नेत्यांनी आधी पक्षातील नेत्यांना न्याय द्या, असा टोला काँग्रेसला लगावला आहे.

माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी रविवारी सकाळी काँग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी दिल्याचा निर्णय जाहीर केला. ते शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुंबई काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. ते दक्षिण मुंबई मतदारसंघातून दोनदा लोकसभेत गेले होते. तर केंद्रात मंत्रीही होते. त्यांच्यासोबत काही माजी नगरसेवकही काँग्रेसला रामराम ठोकणार आहेत.

Apurba Kumar Bhattacharjee, Milind Deora
Milind Deora : तथास्तु...! मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडताच काँग्रेसचा बडा नेता असं का म्हणाला?

दुसरीकडे आसाममध्येही पक्षातील नाराजी सातत्याने समोर येत आहे. आसाम प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व ज्येष्ठ प्रवक्ते अपूर्व भट्टाचार्य (Apurba Kumar Bhattacharjee) यांनी शनिवारी पदाचा राजीनामा दिला आहे. आसाम काँग्रेस कमिटीची घोषणा झाल्यापासूनच ते नाराज होते. त्यांनी सात तारखेलाच याबाबत सूचक ट्विट करून पक्ष सोडण्याबाबतचे सुतोवाच केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भट्टाचार्य यांनी शनिवारी पदाचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, 2013 पासून आजपर्यंत मी पक्षाविरोधात एकही विधान केले नाही. पण मला पक्षातून बाहेर काढण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्यामुळे मला त्रास होत आहे. क्षमता असूनही मला २०१४ पासून आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये मला तिकीट देण्यात आलं नाही. या सर्व गोष्टी विचारात घेऊन मी राजीनामा दिला असल्याचे भट्टाचार्य यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, दोन दिवसांत दोन नेत्यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा समोर आला आहे. भाजपने राहुल गांधींच्या न्याय यात्रा आणि पक्षातील नेत्यांच्या राजीनाम्यावरून टीका केली आहे. काँग्रेसमधून नेते का बाहेर पडत आहेत, असा सवाल करत भाजपने राहुल गांधींनी आधी नेत्यांना न्याय देवा, असा खोचक सल्ला दिला आहे.

Apurba Kumar Bhattacharjee, Milind Deora
Ramdev Baba OBC Controversy : ओबीसीवरून रामदेवबाबांचा नवा 'असत्य'योग; म्हणाले, तो मी नव्हेच!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com