सरकार भी तुम्हारी, दरबार भी तुम्हारा...,राज्यसभेत खर्गेंचा मोदींच्या समोर हल्लाबोल..

संसदेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) राज्यसभेत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi) मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Mallikarjun Kharge - Narendra Modi
Mallikarjun Kharge - Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : २०१४ मध्ये सत्तेवर आल्यावर दर वर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन तुम्ही दिले होतेत, आता म्हणता ५ वर्षांत ६० लाख रोजगार देणार. हा काय प्रकार चालविला आहे, असे संसदेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) राज्यसभेत (Rajyasabha) कडाडले. राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेत खर्गे यांनी, तुम झूठ को सच लिख दो, अखबार भी तुम्हारा है, या काव्यपंक्ती उधृत करून लोकशाही कधी नव्हे इतकी धोक्यात असल्याचे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत त्यांच्या सरकारच्या अनेक आश्वासनांवर आज चौफेर हल्ला चढविला. महागाई आहे, विक्रमी बेरोजगारी आहे, आत्महत्या चालूच आहेत. पण मग अच्छे दिन कोठे गेले, असा सवाल त्यांनी विचारला.

Mallikarjun Kharge - Narendra Modi
किराणा दुकानातील कामगार मुलगा ते खासदार, गजानन बाबर यांचा थक्क करणारा प्रवास..

राजसभेत आज (ता.2 फेब्रुवारी) अभिभाषणावरील धन्यवाद ज्ञापन चर्चा सुरू झाली. उद्यापासून प्रश्नोत्तरांनंतरचा संपूर्ण वेळ चर्चेसाठी दिला जाणार असून नियोजनानुसार ८ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान चर्चेला उत्तर देणार आहेत.

कोरोना (Covid-19) महामारीचे गैरव्यवस्थापन, खोटी आश्वासने, ध्रुवीकरणाने निवडणूका जिंकण्याचा हातखंडा प्रयोग अशा विविध मुद्यांवरून सरकारची पिसे काढणारे खर्गे यांनी, माझ्या पक्षाचा वेळ मी ठरवेन, तुम्ही नव्हे असे भाजप नेत्यांना सुनावले. जर दरवर्षी २ कोटी रोजगार तुम्ही देणार होतात तर, देशात आज इतिहासातील विक्रमी बेरोजगारी का आहे?, प्रत्येक बाबतीत कोरोनाआड लपण्याचा प्रकार होऊ नये, अशीही भावना त्यांनी मांडली. राष्ट्रपतींचे भाषण निवडणूक प्रचाराचे भाषण वाटते, असे सांगताना खरगे म्हणाले की, अभिभाषणात गरीब, बेरोजगार, महागाईने होरपळणारा सामान्य माणूस, शेतकरी यांच्यासाठी काही तरी दिलासा असेल, अशी अपेक्षा होती. पण महागाई-बेरोजगारीचा साधा उल्लेखही भाषणात नाही. पीएम केअर फंडाचा हिशोब तर तुम्हाला द्यावाच लागेल.

Mallikarjun Kharge - Narendra Modi
सर्वाधिक दारुडे अन् दारुचे कारखाने भाजपवाल्यांचेच..

खर्गे म्हणाले की, तुम्ही आज सत्य बोलू देत नाही, सत्य लिहू देत नाही, जो सत्य बोलतो त्याला देशद्रोही लेबल लावता. आपले विचार मांडणाऱयाला तुम्ही नकार देता. २०१४ पासून दर वर्षी २ कोटी याप्रमाणे १५ कोटी रोजगार द्यायला हवे होते, प्रत्यक्षातील चित्र असे की, बेरोजगारीच्या खाईत सारा देश होरपळत आहे. दोन कोटींहून जास्त लोकांच्या नोकऱया हिसकावल्या गेल्या. केवळ सरकारी विभागांतच ९ लाखांपेक्षा जास्त रिक्त पदे आहेत. जनतेने रक्तपाणी एक करून ७५ वर्षांत कमावलेली संपत्ती तुम्ही निवडक उद्योगपतींच्या हातात देत आहात. तुमच्याकडून शेतकरीही फसवला गेला आहे व युवक नोकरीसाठी लाठ्या खात आहेत.

७० वर्षांत तुम्ही काय केले असा तुमचा प्रश्न असेल, तर त्याला उत्तर हे की आम्ही काहीच केले नसते तर तुम्ही जिवंतही दिसला नसतात. आम्हीच लोकशाही व घटना जपून ठेवलेली आहे. त्यामुळेच तुम्ही लोक येथे आहात. इतके सफाईने खोटे बोलत राहिल्याबद्दल तुम्हाला पुरस्कारच मिळायला हवा. प्रत्येक बाबतीतले अपयश तुम्ही झाकून टाकता. विरोधक जेव्हा कामकाजाबाबत प्रश्न विचारतात तेव्हा तुम्हाला धर्म धोक्यात आल्याचा साक्षात्कार होतो, असे सांगताना खर्गे यांनी, महात्मा बसवेश्वर यांच्या कन्नड काव्यपंक्ती उधृत केल्या.

Mallikarjun Kharge - Narendra Modi
पंतप्रधान मोदी यांनी दिलेला हा संदेश भाजप नेते गावोगाव पोहचविणार

कोण काय म्हणाले...

  • सत्तेवरील उच्चपदस्थच प्रचारात धार्मिक भावना भडकावतात हे लोकशाहीसाठी भयानक आहे. उत्तर प्रदेशात सपा सत्तेवर आला तर भाजप पेक्षा कमी वेळात अयोध्येत राम मंदिर बांधेल. - राम गोपाल यादव

  • संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले कृषी कायदे टीव्हीवर येऊन तुम्ही रद्द केलेत तेव्हा संसद तर दूर, पण स्वतःच्या मंत्रिमंडळालाही अंधारात ठेवले. हुकूमशाही यापेक्षा दुसरी काय असते. - विकास रंजन भट्टाचार्य (माकप)

  • बहुमताच्या बळावर तुम्ही प्रत्येक आवाज दाबून टाकत आहात पण लक्षात ठेवा, भआरताची जनता शांत दिसत असली तरी २०२४ मध्ये तुम्हाला सारी उत्तरे मिळणार आहेत. - तिरूची सीवा (द्रमुक)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com