किराणा दुकानातील कामगार मुलगा ते खासदार, गजानन बाबर यांचा थक्क करणारा प्रवास..

लोकसभेतील (Loksabha) उत्कृष्ट कामगिरीसाठी गजानन बाबर (Gajanan Babar) दोनदा संसदरत्न हा पुरस्कार मिळाला होता.
Gajanan Babar
Gajanan Babar Sarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघाचे (Maval Lok Sabha constituency) पहिले खासदार गजानन धरमशी बाबर (Gajanan Babar) यांचे बुधवारी (ता.२ फेब्रुवारी) अल्पशा आजाराने बाणेर, पुणे येथील ज्युपिटर रुग्णालयात निधन झाले. किराणा दुकानातील पोरगा ते खासदार असा त्यांचा थक्क करणारा प्रवास राहिला आहे. शिवसेनाप्रमुख (Shivsena) बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) किराणा दुकानातील पोराला आमदार, खासदार केले, असे ते अभिमानाने सांगत असत.

Gajanan Babar
पिंपरी-चिंचवडमध्ये पहिली सेना शाखा सुरू करणारे, माजी खासदार बाबर यांचे निधन

राजकीय कारकिर्दीच्या उत्तरार्धात त्यांची सर्वच राजकीय पक्षांकडून निराशा झाल्याने ते राजकारणापासून काहीसे अलिप्त झाले होते. २०१४ ला विद्यमान खासदार असतानाही त्यांना डावलून पक्षाने श्रीरंग बारणे यांना मावळमधून लोकसभेची उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज होत त्यांनी त्यावेळी भरात असलेल्या मनसेत प्रवेश केला. पण, तेथे ते दुर्लक्षित राहिले. म्हणून त्यांनी २०१६ ला देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हातात कमळ घेतले. पण, तेथेही निराशा झाल्याने २०१९ ला ते स्वगृही शिवसेनेत परतले होते. गेल्या दीड महिन्यापासून ते आजारी होते. पोटाचा विकार बळावल्याने त्यांना काल रुग्णालयात दाखल केले होते. आज तेथे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे बंधू मधुकर हे शिवसेनेचे सल्लागार, तर पुतण्या योगेश हा सहसंपर्कप्रमुख आहे.

Gajanan Babar
राष्ट्रवादीने कोंडी करताच भाजप नेत्यांनी दिला हा इशारा..

१९७५ पासून राजकारणात सक्रिय..

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सलग तीनदा नगरसेवक राहिलेले बाबर हे महापालिका हे शहरात नगरपालिका होती, तेव्हापासून म्हणजे १९७५ पासून राजकारणात सक्रिय होते. तसेच सध्या अस्तित्वात नसलेल्या हवेली या राज्यातील सर्वात मोठ्या विधानसभा मतदारसंघाचे ते दोनदा आमदारही होते. त्यावेळी मतदारसंघातील पाणीप्रश्नी केलेल्या पाठपुराव्यामुळे ते पाण्यावाले बाबर म्हणून हवेलीत ओळखले जात होते. २००९ ला मावळ या नवनिर्मित लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार म्हणून शिवसेनेकडून निवडून आले होते. लोकसभेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना दोनदा संसदरत्न हा पुरस्कार मिळाला होता. लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणारे ते दुसऱ्या क्रमाकांचे खासदार ठरले होते.

Gajanan Babar
'मी देखील गृहमंत्री होवू शकतो'; असं तर नितेश राणेंना सुचवायचे नसेल ना?
Gajanan Babar
Gajanan Babar Sarkarnama

मावळ आणि संसदरत्न हे एक समीकरण..

दिल्लीत असले तरी त्यांचे इकडे शहरात गल्लीपर्यंत बारीक लक्ष होते. म्हणून शहरातील बहूतांश चाळीस संघटनांशी ते सबंधित होते. स्वताच्या नावे त्यांनी सहकारी बॅंक (गजानन लोकसेवा सहकारी बॅंक) स्थापन केली होती. पिंपरी-चिंचवड ज्वेलर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष होते. तर, गावाकडील किसनवीर (सातारा) सहकारी साखर कारखान्याचेही ते उपाध्यक्ष होते. सायबर कॅफे असोसिएशन, महाराष्ट्र राज्य फेअर प्राइस शॉपकिपर्स असोसिएशन, जय महाराष्ट्र टेम्पो असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. मावळचे विद्यमान खासदार शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे २०१४ ला पहिल्यांदा खासदार झाले. त्यांनी पहिल्याच टर्ममध्ये सलग पाचवर्षे संसदरत्न हा बहूमान पटकावला. तर, दुसऱ्या टर्ममध्ये महासंसदरत्न पुरस्काराचे ते मानकरी ठरलेले आहेत. एकूणच मावळ आणि संसदरत्न हे समीकरण झालेले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com