New Delhi : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला. या निकालानंतर ट्रम्प यांनी आपल्या पहिल्याच विजयी भाषणात अमेरिकेत सुवर्णयुगाची सुरुवात करणार असल्याची शपथ घेतली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी टेस्ला आणि स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनाही विजयाचे श्रेय दिले आहे. इलॉन हे विजयाचे स्टार असल्याचे विधान ट्रम्प यांनी केले आहे. तसेच त्यांच्यावर कौतुकाचाही वर्षाव केला. मस्क यांनी ट्रम्प यांच्या संपूर्ण प्रचारादरम्यान सातत्याने त्यांची बाजू घेतली होती. तसेच प्रचारासाठी कोट्यवधी रुपयांचा निधीही दिला होता.
सोशल मीडियातही इलॉन मस्क सक्रीय होते. त्यामुळे प्रचारमोहिमेचाही ट्रम्प यांना फायदा झाल्याचे मानले जाते. दरम्यान भाषणादरम्यान बोलताना ट्रम्प म्हणाले, हे एक आंदोलन होते. आधी कुणीच हे पाहिले नव्हते. माझ्या मतानुसार हे सर्वात मोठे राजकीय आंदोलन होते. बहुतेक यापूर्वी कधीच असे झाले नाही.
मी अखेरच्या श्वासापर्यंत अमेरिकेतील प्रत्येक नागरिक, त्यांचे कुटुंब आणि त्यांच्या भविष्यासाठी लढेन. प्रत्येक दिवशी मी तुमच्यासाठी लढत राहीन. आपण आपल्या मुलांचा हक्क असलेला मजबूत, सुरक्षित आणि समृध्द अमिरेका देश निर्माण करेपर्यंत मी आराम करणार नाही. हे अमेरिकेचे सुवर्णयुग असेल, अशी भावना ट्रम्प यांनी व्यक्त केली.
दरम्यान, ट्रम्प अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष असतील. ते दुसऱ्यांचा या खुर्चीवर विराजमान होणार आहे. यापूर्वी त्यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला होता. मात्र, मागील निवडणुकीत ज्यो बायडेन यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. आता पुन्हा एकदा त्यांनी सलग तिसऱ्या निवडमुकीत कमला हॅरिस यांना पराभूत करून विजय मिळवला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.