US Election 2024: अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इतिहास घडवला आहे. या निवडणुकीत त्यांनी बहुमताचा आकडा पार केला असून ते पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. ते अमेरिकेचे 47 वे अध्यक्ष असतील.
फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, निवडणुकीत आतापर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंत 277 मते मिळाली आहे. बहुमतासाठी 270 मतांची आवश्यकत आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प या निवडणुकीत विजयी झाल्याचे या वृत्तात म्हटले आहे. डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना आतापर्यंत 226 मते मिळाली आहेत.
निवडणुकीचा प्रचार सुरू असताना दोन्ही उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर असल्याचे एक्झिट पोलमध्ये दिसत होते. मात्र, मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर सुरूवातीपासूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी आघाडी घेतली. अनेक राज्यांमध्ये ट्रम्प यांचा एकहाती विजय झाला. तर हॅरिस यांना कॅलिफोर्नियामध्य चांगली मते मिळाली.
अमेरिकेतील सात महत्वाच्या राज्यांमध्येही ट्रम्प यांनी आघाडील घेतली आहे. ही राज्यांतून मिळालेली आघाडी राष्ट्राध्यक्ष कोण होणार, हे ठरवतात. त्यामध्ये पेनिसिल्विनिया, जॉर्जिया, अरिझोना, मिशीगन, नेवाडा, नॉर्ड कॅरोलिना आणि विस्कोन्सिन या राज्यांचा समावेश आहे. बहुतेक ठिकाणी ट्रम्प यांना आघाडी मिळाली आहे.
दरम्यान, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या जोमाने प्रचार करणारे इलॉन मस्क यांनीही ट्रम्प यांचा ‘क्लिस्टल क्लिअर’ विजय झाल्याचे म्हटले आहे. मस्क यांनी ट्रम्प यांच्या प्रचारासाठी कोट्यवधी रुपये दिले होते.
अमेरिकेमध्ये माजी राष्ट्राध्यक्षांनी निवडणुकीत पराभवानंतर पुन्हा झालेल्या निवडणुकीत विजय मिळवण्याची घटना 133 वर्षांनंतर पहिल्यांदाच घडली आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होताना इतिहास घडवला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.