Rahul Gandhi : बाळासाहेब ठाकरेंविषयी मोदींकडून आव्हान; पुण्यतिथीनिमित्त राहुल गांधींची पोस्ट चर्चेत

Balasaheb Thackeray Death Anniversary Narendra Modi Uddhav Thackeray Aaditya Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईतील प्रचारसभेत राहुल गांधींनी बाळासाहेब ठाकरेंविषयी दोन कौतुकाचे शब्द बोलून दाखवावेत, असे आव्हान दिले होते.
Rahul Gandhi, Narendra Modi
Rahul Gandhi, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा रविवारी 12 वा स्मृतीदिन. यानिमित्त महाराष्ट्रासह देशभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर त्यांना आदरांजली वाहत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईतील प्रचारसभेत दिलेल्या आव्हानांतर राहुल गांधींनी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत उद्धव ठाकरेंची शिवसेनाही आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता मुंबईतील प्रचारसभेत त्यांना आव्हान दिले होते. बाळासाहेब ठाकरेंना ज्यांना अपमानित केले, त्यांच्यात हातात आत्मसन्मानाचा रिमोर्ट कंट्रोल देण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्या तोंडून दोन शब्द तरी बाळासाहेब ठाकरेंची स्तुती करवून दाखवावी, असे आव्हान मोदींनी उद्धव ठाकरेंना दिले होते.

Rahul Gandhi, Narendra Modi
Manipur Violence : मणिपूर पेटले, अमित शाह प्रचार अर्धवट सोडून दिल्लीत; राज्याने केली मोठी मागणी

प्रियांका गांधींकडून प्रत्युत्तर

शिर्डी येथील प्रचारसभेत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शनिवारी मोदींच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान मोदी माझ्या भावासंदर्भात वारंवार बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेतात. मी राहुल गांधींची बहीण असून मी म्हणते, मोदीजी, बाळासाहेब ठाकरेजींचे नाव ऐका. आमची विचारधारा, राजकीय विचार वेगळे होते. पण ना बाळासाहेब ठाकरे, ना राहुल गांधी, ना काँग्रेसचा कुठलाही नेता शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही, अशी टीकाही प्रियांका गांधींनी मोदींवर केली.

राहुल गांधींची पोस्ट

राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन केले आहे. तसेच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संपूर्ण शिवसेना परिवारासोबत आपण असल्याची भावना राहुल गांधींनी पोस्टमध्ये व्यक्त केली आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ही पोस्ट रिट्विट करत ‘जय महाराष्ट्र’ म्हटले आहे.  

Rahul Gandhi, Narendra Modi
Kailash Gahlot : केजरीवालांना सर्वात मोठा धक्का; गंभीर आरोप करत बड्या नेत्याचा ‘आप’ला रामराम

मोदींकडूनही अभिवादन

पंतप्रधान मोदींनीही एक्सवर पोस्ट करत आदरांजली वाहिली आहे. 'महाराष्ट्राचा विकास आणि मराठी लोकांच्या सक्षमता यासाठी आग्रही असे ते एक द्रष्टे व्यक्तिमत्व होते. भारतीय संस्कृती आणि मूल्यांचे संवर्धन करून त्याविषयीचा अभिमान वृद्धिंगत करण्यावर त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांचा धीरगंभीर आवाज आणि अढळ ध्येयासक्ती येणाऱ्या पिढयांना कायम प्रेरणा देत राहील', असे मोदींनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com