Manipur Violence : मणिपूर पेटले, अमित शाह प्रचार अर्धवट सोडून दिल्लीत; राज्याने केली मोठी मागणी

Amit Shah AFSPA COCOMI : सशस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत काही संघटनांनी सरकारला 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे.
Manipur Violence, Amit Shah
Manipur Violence, Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकल्याने राज्य आणि केंद्र सरकारचे टेन्शन वाढले आहे. आंदोलकांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या जावयासह काही मंत्री व आमदारांच्या घरावर हल्ला केला होता. त्यानंतर अनेक भागांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील प्रचारदौरा रद्द करून रविवारी दिल्ली गाठली.

मणिपूरमधील हिंसाग्रस्त जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. हिंसेवर नियंत्रण मिळवण्याचा आल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. दरम्यान, राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र लिहून मोठी मागणी केली आहे. मणिपूरमधून आर्म फोर्स स्पेशल पॉवर कायदा म्हणजे AFSPA तातडीने पूर्णपणे हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या राज्यातील काही भागांत हा कायदा लागू करण्यात आला आहे.

Manipur Violence, Amit Shah
Kailash Gahlot : केजरीवालांना सर्वात मोठा धक्का; गंभीर आरोप करत बड्या नेत्याचा ‘आप’ला रामराम

मैतई समाजातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मणिपूर अखंडता समन्वय समितीने राज्य सरकारला 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. कुकी कट्टरवाद्यांवर तातडीने लष्करी कारवाई करून हा कायदा हटवण्याची मागणी या संघटनेने केली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे. हिंसेच्या पार्श्वभूमीवर अमित शहांनी महाराष्ट्रातील दौरा अर्धवट सोडून दिल्ली गाठली आहे.

पुन्हा का वाढली हिंसा?

काही दिवसांपूर्वी इंफाळमधील एकाच कुटुंबातील सहा सदस्य अचानक बेपत्ता झाले होते. या सहा जणांचे मृतदेह आसाम सीमेवरी नदीमध्ये आढळून आल्याचे आता सामोर आले आहे. या सहा जणांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. मैतई लोकांना याची माहिती मिळताच संपाप वाढला. त्यानंतर शनिवारी जमावाने मुख्यमंत्र्यांच्या घरासह त्यांचे जावाई आणि सात आमदारांच्या घरावरही हल्ला चढवला.

Manipur Violence, Amit Shah
Kangana Ranaut : 'आम्ही पाकव्याप्त काश्मीरलाही सोबत घेणार...', कंगना रनौतचा दावा

रस्त्यांवरील वाहनांना जमावाने आगी लावल्या. जमाव मोठा असल्याने लष्कर आणि इतर सुरक्षा दलांनाही काही करता आले नाही. या हिंसेनंतर राज्यातील अनेक भागांतील इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली असून काही जिल्ह्यांमध्ये कर्प्यू लागू करण्यात आला आहे. परिस्थिती आणखी चिघळू नये, यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून पावले उचलली जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com