पेट्रोल, डिझेल, गॅस महागताच राहुल गांधी म्हणाले, आता खरा विकास सुरू झाला!

देशांतील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले असून, आता पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरू झाली आहे.
Rahul Gandhi, PM Narendra Modi
Rahul Gandhi, PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : देशांतील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीमुळे पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर मागील चार महिन्यांहून अधिक काळ स्थिर होते. आता निवडणुकीनंतर जनतेला पहिला धक्का बसला आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. याचवेळी स्वयंपाकाचा गॅस सिलिंडरही तब्बल 50 रुपयांनी महागला आहे. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला आहे. (Petrol Diesel price hike News)

सुमारे चार महिन्यांनंतर आज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ सुरू झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैसे वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96.21 रुपये झाला असून, डिझेलचा दर 87.47 रुपये आहे. याचवेळी स्वयंपाकाचा गॅस (LPG) सिलिंडरच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यानंतर ही पहिली दरवाढ आहे. यानंतर राहुल गांधींनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीवरील लॉकडाऊन अखेर मागे घेतला आहे. आता सरकार त्यांच्या किमतीचा सातत्याने विकास करेल. महागाई आणि महामारीबाबत पंतप्रधान मोदींना विचारल्यास ते म्हणतील की, थाळी वाजवा.

Rahul Gandhi, PM Narendra Modi
भास्कर जाधवांची कोंडी! मुलानंच सांगितला गुहागर मतदारसंघावर दावा

रशियाने युक्रेनवर पुकारलेल्या युद्धाचे चटके आता सगळ्यांनाच बसू लागले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवले असले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावाचा भडका उडाला आहे. खनिज तेलाचा भाव आता प्रतिबॅरल 110 डॉलरवर गेला आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही. असे असतानाही उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या काळात पेट्रोल, डिझेलचे दर सुमारे चार महिने स्थिर होते. या निवडणुकांच्या निकालानंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरात आता वाढ सुरू झाली आहे. याआधी सीएनजीचा दरात सातत्याने वाढ करण्यात आली असून, यानंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरचा नंबर असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. यामुळे आगामी काळात सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.

Rahul Gandhi, PM Narendra Modi
चार महिन्यांत तीन मुख्यमंत्री पाहिलेल्या भाजपच्या राज्यात अखेर हरलेला नेताच बनला सीएम!

देशात सध्या महागाईचा भडका उडाल्याने मागील वर्षी मोदी सरकारने (Modi Government) पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले. यानंतर पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका (Assembly Elections) असल्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला होता. या निवडणुका संपल्या असून, या पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा भडका उडण्याचा अंदाज आहे. पेट्रोलचा दर प्रतिलिटर 12 ते 25 रुपये वाढण्याची शक्यता आहे. मोदी सरकारने गेल्या वर्षी 4 नोव्हेंबरला पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली. यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडूनही दरवाढ थांबवण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com