Shashi Tharoor
Shashi TharoorSarkarnama

Shashi Tharoor : उत्तर प्रदेश किसे कहते है? शशी थरूर यांच्या पोस्टने गदारोळ, तुम्हीही एकदा उत्तर वाचाच…

Uttar Pradesh NEET Exam Shashi Tharoor Jitin Prasad : देशभरात प्रवेश परीक्षांमधील पेपरफुटीचा मुद्दा गाजत असतानाच शशी थरूर यांनी केलेली पोस्ट वादात अडकली आहे.

New Delhi : देशभरात सध्या नीट परीक्षेतील पेपरफुटीचा मुद्दा गाजत आहे. अनेक उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पेपरफुटीचे जाळे पसरल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच इतर काही प्रवेश परीक्षांमधील घोळही समोर येत आहेत. यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी सोशल मीडियात केलेल्या एका पोस्टने वाद निर्माण झाला आहे.

शशी थरूर यांनी एक्सवर ही पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी शानदार! परीक्षा पे चर्चा, असे लिहिले आहे. तसेच त्यासोबत एका मुलाच्या परीक्षेतील उत्तरपत्रिकेचा फोटोही या पोस्टमध्ये दिसत आहे. त्यावरूनच गदारोळ निर्माण झाला आहे.

पोस्टमध्ये उत्तर प्रदेश किसे कहते है? हा प्रश्न दिसत आहे. त्याखाली लिहिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, ‘वह प्रदेश जहा परीक्षा से पहले उत्तर का पता चल जाएं उसे उत्तर प्रदेश कहते है!’ एवढेच नाही तर या उत्तराला दहा पैकी दहा गुण देण्यात आले आहेत. तर सन्मान लायक हो बेटा!, असे कौतुकही संबंधित शिक्षकाने केल्याचे पोस्टमध्ये दिसते.

Shashi Tharoor
Rahul Gandhi : तुम्ही माझे घर, कुटुंब! खासदारकीच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचे ‘इमोशनल’ पत्र

शरूर यांची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. त्यावर भाजप नेत्यांकडूनही पलटवार करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेशाचा हा अपमान निंदनीय आहे. याची कडक शब्दांमध्ये निंदा करायला हवी. मला माझे राज्य आणि येथील लोकांविषयी अशा निंदनीय टिप्पणीमध्ये कोणताही विनोद वाटत नाही.

Shashi Tharoor
Uttar Pradesh MLA : राज्यसभेसाठी साथ देणारे ‘ते’ 7 आमदार भाजपला नकोसे! आता पदही जाणार?   

भाजपच्या इतर नेत्यांकडूनही शरूर यांचा समाचार घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे शहरी विकास मंत्री ए. के. शर्मा यांनी म्हटले आहे की, काँग्रेसने आपल्या नेत्याचा विजय होताचा नेहमीप्रमाणे उत्तर प्रदेशचा अपमान करण्यास सुरूवात केली आहे. जीवनदान दिलेल्या राज्यातील जनतेचे धन्यवाद करण्याऐवजी अपमान केला. शशी थरूर यांच्याकडून वेगळी अपेक्षाही नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com