Karnataka assembly election : ''कर्नाटकमध्ये भाजपला 60 जागा सुद्धा मिळणार नाहीत''

Siddaramaiah News : कर्नाटकची विधानसभा निवडणूक जाहिर झाली आहे.
Narendra Modi, Amit Shah
Narendra Modi, Amit ShahSarkarnama

Karnataka News : कर्नाटकची विधानसभा निवडणूक जाहिर झाली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप 150 जागा जिंकणार असा दावा, भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (B. S. Yeddyurappa) यांनी केला होती. त्यावर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

बी. एस. येडियुरप्पा यांनी दावा केला होता की भाजप 150 पेक्षा जास्त जागा जिंकणार आहे. त्यांच्या या वक्तव्यावर सिद्धरामय्या म्हणाले, भाजप ६० जागाही जिंकू शकणार नाही. काँग्रेस (Congress) स्वबळावर सत्तेत येणार आहे. दरम्यान, गुब्बी मतदारसंघातील जेडीएस आमदार श्रीनिवास यांनी सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डि. के. शिवकुमार यांच्या उपस्थित पक्षात प्रवेश केला. यावेळी सिद्धरामय्या माध्यमांशी बोलत होते.

Narendra Modi, Amit Shah
Bjp Mla Viral Video : भाजप आमदाराचा कारनामा; विधानसभेत पाहत होते पोर्न व्हिडीओ : व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, कर्नाटक विधानसभेची निवडणूक बुधवारी जाहीर झाली. राज्यात १० मे रोजी मतदान होणार असून १३ मे रोजी निकाल लागणार आहे. बी. एस. येडियुरप्पा म्हणाले, मी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मी वयाची ८० वर्षे ओलांडल्यामुळे मुख्यमंत्रिपदाचाही राजीनामा दिला होता. माझे वय ८० वर्षांपेक्षा जास्त असले तरी मी यावेळीच नव्हे; तर पुढच्या वेळीही राज्याचा दौरा करणार आहे.

या निवडणुकीतच नव्हे; तर पुढच्या निवडणुकीत आम्ही भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळेल, असा दावाही त्यांनी केला. कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा सत्तेत येऊ. काँग्रेस भ्रष्ट आहे; म्हणूनच ४० टक्के कमिशनचे खोटे आरोप आमच्यावर करत आहे, हा मतदारांचा प्रश्न नाही, असा आरोप येडियुराप्पा यांनी केला होता.

Narendra Modi, Amit Shah
B. S. Yediyurappa's Big Announcement: भाजप नेत्याची मोठी घोषणा: 'मी विधानसभेची निवडणूक लढवणार नाही'

नऊ लाख मतदार प्रथमच करणार मतदान

या निवडणुकीत एकूण पाच कोटी २१ लाख ७३ हजार ५७९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यापैकी २.५९ कोटी महिला, तर २.६२ कोटी पुरुष मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, राज्यात एकूण ९.१७ लाख मतदार आहेत, जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. त्यांचे वय १८ ते १९ या दरम्यान आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com