B. Nagendra Will Resign : कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमधील पहिली विकेट पडणार

Maharishi Valmiki Development Corporation scam : महर्षी वाल्मिकी विकास महामंडळाचे अधिकारी पी. चंद्रशेखर यांच्या आत्महत्येप्रकरणी मंत्री बी. नागेंद्र यांनी राजीनामा द्यावा, अशी सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिल्याची माहिती आहे. काँग्रेस सरकार अडचणीत येऊ नये; म्हणून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
B. Nagendra
B. NagendraSarkarnama

Bangalore, 31 May : कर्नाटकातील महर्षी वाल्मिकी विकास महामंडळाच्या मनी ट्रान्स्फर घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस सरकारची पहिली विकेट पडणार हे आता निश्चित झाले आहे. कारण मनी ट्रान्स्फर घोटाळा हा या अनुसुचित जमाती विकास आणि क्रीडा मंत्री बी नागेंद्र यांच्या तोंडी सूचनेवरूनच झाला आहे, अशी चिठ्ठी लिहून महामंडळाचे अधिकारी पी. चंद्रशेखर यांनी आत्महत्या केली आहे. त्यावरून कर्नाटकात विरोधकांनी रान उठवले आहे. आता हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात आले आहे.

महर्षी वाल्मिकी विकास महामंडळाचे अधिकारी पी. चंद्रशेखर यांच्या आत्महत्येप्रकरणी मंत्री बी. नागेंद्र (B. Nagendra) यांनी राजीनामा द्यावा, अशी सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी दिल्याची माहिती आहे. काँग्रेस सरकार अडचणीत येऊ नये; म्हणून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. चौकशीत निर्दोष आढळल्यास बी. नागेंद्र यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचा शब्दही सिद्धरामय्या यांनी दिल्याची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

B. Nagendra
Vijaykumar Deshmukh : देवेंद्र फडणवीसांना दिलेला मताधिक्क्याचा शब्द विजयकुमार देशमुख खरा करून दाखवणार?

मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे विधान परिषद उमेदवारीसंदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. त्या ठिकाणी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबरोबर चर्चा केली. महर्षी वाल्मिकी विकास महामंडळाचे अधिकारी पी. चंद्रशेखर यांच्या आत्महत्येनंतर भाजपडून काँग्रेस सरकार आणि मंत्री नागेंद्र यांच्यविरोधात आवाज उठवला आहे.

विरोधी पक्षांकडून होणारे हल्ले आणि संभाव्य राजकीय परिणामांची चर्चा सिद्धरामय्या यांनी काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांच्यासोबत केल्याची माहिती आहे. या प्रकरणी मंत्री नागेंद्र यांचा राजीनामा घेणे योग्य होईल. चौकशीत ते निर्दोष आढळले, तर नागेंद्र यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यात येईल, असेही बैठकीत ठरविण्यात आले आहे. खर्गे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नागेंद्र राजीनामा द्यावा, अशी सूचना केली आहे.

कर्नाटक सरकारच्या अख्यातरित असणाऱ्या महर्षी वाल्मिकी विकास महामंडळात ८७ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. त्यानंतर महामंडळाचे अधिकारी चंद्रशेखर यांनी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे. त्या चिठ्ठीत काही राजकीय नेत्यांची नावेही नमूद असल्याचे सांगण्यात येते. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांसह काही कर्मचाऱ्यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले असून हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आले आहे.

B. Nagendra
Pankaja Munde-Raosaheb Danve : पंकजाताई, दानवेंचा पराभव होणारच; शिवसेना नेत्याचा मोठा दावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com