Congress MLA Accident: काँग्रेस आमदाराच्या कारची इलेक्ट्रिक स्कूटरला जोरदार धडक; आमदारांसह दोघे जखमी

Madhya Pradesh Congress MLA Bherusingh Parihar News:मध्य प्रदेशचे काँग्रेस आमदार भेरूसिंग परिहार यांच्या कारची राजस्थानमधील चौमहला येथे इलेक्ट्रिक स्कूटरला धडक बसली. या अपघातात आमदारांसह स्कूटरस्वार जखमी झाला.
Congress MLA Accident
Congress MLA AccidentSarkarnama
Published on: 
Updated on: 
  • मध्य प्रदेशचे काँग्रेस आमदार भेरूसिंग परिहार यांच्या कारचा राजस्थानमध्ये अपघात.

  • इलेक्ट्रिक स्कूटरला जोरदार धडक; आमदाराच्या मानेला दुखापत.

  • स्कूटरस्वार लालसिंगही जखमी; दोघांनाही रुग्णालयात दाखल केले.

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदार भेरूसिंग परिहार यांच्या कारचा राजस्थानमध्ये अपघात झाला आहे. त्यांच्या कारची इलेक्ट्रिक स्कूटरला जोरदार धडक बसल्याने आमदारांसह स्कूटरवरील व्यक्ती जखमी झाला. गुरुवारी रात्री राजस्थानमधील चौमहला परिसरात ही घटना घडली. अपघातानंतर दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

भेरूसिंग परिहार हे मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील सुसनेर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार आहेत. ते आपल्या खासगी कारने चौमहला येथून कुंडालाच्या दिशेने प्रवास करत होते. यावेळी निपानिया फाटा परिसरातील जंक्शनजवळ त्यांच्या कारची इलेक्ट्रिक स्कूटरला धडक बसली. या धडकेत कारमधील आमदार परिहार आणि स्कूटरवर असलेले लालसिंग हे दोघेही जखमी झाले.

अपघाताची तीव्रता लक्षात येताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. स्थानिकांनी दोन्ही जखमींना चौमहला येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. आमदार परिहार यांच्या मानेला दुखापत झाली असून, त्यांच्या शरीरावर इतर ठिकाणीही जखमा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोग्य केंद्रात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात पाठवले.

या अपघातात जखमी झालेल्या लालसिंग यांचे वय २६ वर्षे असून, ते रुंडी गावचे रहिवासी आहेत. त्यांच्यावर चौमहला रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

Congress MLA Accident
Bachchu Kadu: आंदोलन भोवले? बच्चू कडूंसह सहा जणांवर गुन्हा; काय आहेत आरोप?

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन आवश्यक तपासाची प्रक्रिया सुरू केली. अपघात नेमका कसा घडला, याबाबत अधिक माहिती समोर येणे बाकी आहे.

Congress MLA Accident
NMC Relief for MBBS Students: नापास झालात तरी आणखी एक संधी! आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विशेष बाब म्हणून मोठा निर्णय

काँग्रेस आमदाराच्या अपघाताची बातमी परिसरात पसरताच त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयात गर्दी केली. त्यामुळे रुग्णालय परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना अतिरिक्त बंदोबस्त तैनात करावा लागला.

या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. आमदार भेरूसिंग परिहार यांच्या प्रकृतीबाबत पुढील वैद्यकीय तपशील समोर आल्यानंतर त्यांच्या दुखापतींचे स्वरूप अधिक स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com