Congress MLA : काँग्रेस आमदाराचे पद घालविण्यासाठी मध्यरात्री विधानसभेत मोठ्या हालचाली; प्रमुख सचिवांनी आदेश काढलाच...

Rajendra Bharti disqualified, MLA membership cancelled : काँग्रेसचे नेते दावा करत असताना गुरूवारी रात्री प्रमुख सचिव अरविंद शर्मा विधानसभेत दाखल झाले. त्यानंतर कायद्यानुसार दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्याने भारती यांचे सदस्यत्व रदद् करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
Congress MLA membership cancelled
Congress MLA membership cancelledSarkarnama
Published on
Updated on

Congress MLA membership cancelled : काँग्रेस आमदाराचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी चक्क गुरूवारी मध्यरात्री विधानसभा सचिवालय उघडण्यात आल्याचे समोर आले आहे. कोर्टाने एका प्रकरणात संबंधित आमदाराला तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मात्र, कोर्टाने त्यांना हायकोर्टात अपील दाखल करण्यासाठी मुदत दिली आणि जामीनही मंजूर केला आहे.

शिक्षेवर स्थगिती असल्याने आमदाराचे सदस्यत्व रद्द करता येणार नाही, असा काँग्रेसचा दावा होता. पण विधानसभा सचिवालयाकडून गुरूवारी मध्यरात्री कार्यालय उघडण्यात आले अन् सदस्यत्व रद्दचा आदेशही काढण्यात आला. हे प्रकरण मध्य प्रदेशातील असून काँग्रेसचे दतियाचे आमदार राजेंद्र भारती यांना पद गमवावे लागले आहे.

राजेंद्र भारती यांच्यावर बँकेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता. याप्रकरणी दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टाने त्यांना गुरूवारी दुपारी तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. पण हा आदेश देताना कोर्टाने त्यांना हायकोर्टात दाद मागण्यासाठी मुदतही दिली. त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी शाबूत राहील, असा दावा केला जात होता.

Congress MLA membership cancelled
Congress MLA : भाजपच्या बड्या नेत्याला धूळ चारणाऱ्या काँग्रेसच्या आमदाराला 3 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षांपूर्वीचे प्रकरण भोवले, पद जाणार...

काँग्रेसचे नेते दावा करत असताना गुरूवारी रात्री प्रमुख सचिव अरविंद शर्मा विधानसभेत दाखल झाले. त्यानंतर कायद्यानुसार दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्याने भारती यांचे सदस्यत्व रदद् करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्याचवेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी शिक्षेला स्टे असल्याचे शर्मा यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच एवढ्यारात्री विधानसभा का उघडली, असा सवालही केला.

पटवारी यांना काहीही उत्तर न देता शर्मा विधानसभेतून निघून गेले. त्यांनी काही वेळातच भारती यांचे सदस्यत्व रद्द झाल्याचे आदेश निघाले. दतियाची जागा रिक्त झाल्याचे पत्रही निवडणूक आयोगाला रवाना करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणावरून काँग्रेसने कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.

Congress MLA membership cancelled
Iran War update : युध्द सुरू असतानाच समुद्रात मोठा उलटफेर; इराणमधून तब्बल 7 वर्षांनी भारताकडे निघालेल्या जहाजावर ‘स्ट्राईक’

पटवारी म्हणाले की, ‘भाजप लोकशाही संपविण्याच्या तयारीत आहे. माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यावरील पेड न्यूज संदर्भातील प्रकरण विधानसभेत प्रलंबित आहे. आमदार निर्मला सप्रे यांच्या प्रकरणात काहीच कारवाई होत नाही. मात्र, राजेंद्र भारती यांच्याकडे शिक्षेविरोधाल अपील करण्यासाठी मुदत असूनही सदस्यत्व रद्द करण्यात आले.’ दरम्यान, आता हायकोर्टाने भारती यांच्या शिक्षेला स्थगिती न दिल्यास दतिया मतदारसंघात पोटनिवडणूक होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com