Congress News : दिल्लीत काँग्रेसला झटका; पक्षांतर्गत वादातून अध्यक्षांचा राजीनामा

Arvinder Singh Lovely News : दिल्ली काँग्रेसचे प्रभारी महासचिव दीपक बाबरिया यांच्याविषयी लवली यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
Rahul Gandhi, Arvinder Singh Lovely
Rahul Gandhi, Arvinder Singh LovelySarkarnama

New Delhi News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच काँग्रेसला (Congress News) पुन्हा झटका बसला आहे. दिल्लीत पुढील महिन्यात लोकसभेची निवडणूक आहे. त्याआधीच दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदर सिंह लवली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लवली यांनी दिल्ली काँग्रेसचे प्रभारी महासचिव दीपक बाबरिया यांच्याविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

लवली यांनी आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांना पत्र लिहित राजीनामा दिला आहे. त्यांनी पत्रातून बाबरिया यांच्याविषयीच्या तक्रारींचा पाढाच वाचला आहे. बाबरिया यांच्याविरोधात नेत्यांना पक्ष संघटनेतून बाहेर काढण्याचा आपल्यावर दबाव असल्याने राजीनामा दिल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. (Lok Sabha Election 2024)

Rahul Gandhi, Arvinder Singh Lovely
Lok Sabha Election 2024 : देवभूमीत भाजप ‘क्लीन स्वीप’ची हॅट॒ट्रिक साधणार की काँग्रेस कमबॅक करणार?

लवली यांनी म्हटले आहे की, मी पक्षामध्ये स्वत:ला खूप लाचार समजत आहे. त्यामुळे दिल्लीच्या (Delhi) अध्यक्षपदी राहू शकत नाही. दिल्ली काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेले निर्णय दिल्लीचे प्रभारी एकतर्फी थांबवत आहेत. अध्यक्ष बनल्यापासून मला कोणत्याही वरिष्ठ पदावरून पदाधिकाऱ्यांची नेमणूक करता आलेली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मी एका अनुभव नेत्याची मीडिया प्रभारी पदी नियुक्तीसाठी आग्रह धरला होता. पण दिल्ली प्रभारींनी ती मागणी मान्य केली नाही. अजून ब्लॉक प्रभारी नियुक्तीलाही त्यांनी मंजूरी दिलेली नाही. त्यामुळे आतापर्यंत दिल्लीत जवळपास 150 ब्लॉक प्रभारींची नियुक्ती होऊ शकलेली नाही, असेही लवली यांनी म्हटले आहे.

आघाडीबाबतही नाराजी

काँग्रेसवर खोटे भ्रष्टाचाराचे आरोप करून बनलेल्या पक्षासोबत आघाडी करण्याच्याविरोधात दिल्ली काँग्रेस होती. कॅबिनेटमधील अर्धे मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपात जेलमध्ये आहेत, त्याच आम आदमी पक्षासोबत (AAP) काँग्रेसने आघाडी केली आहे. पण त्यानंतरही ही पक्षासाठी या आघाडीचे समर्थन केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक झाल्यानंतर मी त्यांच्या घरीही गेलो होतो, असे लवली म्हणाले.

उमेदवारी मागे घेतली

आघाडीमध्ये काँग्रेसला तीन जागा मिळाल्यानंतर मी आपली उमेदवारीची इच्छा पुढे येऊ दिली नाही. पण जाहीरपणे त्याबाबत स्पष्ट केले. पण पक्षाने दोन जागांवर दिल्ली काँग्रेस आणि पक्षाच्या धोरणांची माहिती नसलेल्या नेत्यांना उमेदवारी दिली. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या म्हणणे विचारात घेतले गेले नाही, असा आरोपही लवली यांनी केला आहे.    

Rahul Gandhi, Arvinder Singh Lovely
Loksabha Election 2024 : पोरबंदर मतदारसंघ; मंडावियांचे आव्हान काँग्रेस पेलणार का..?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com