Gujrat Loksabha News : गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील पोरबंदर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुखभाई मंडाविया यांच्या उमेदवारीमुळे लक्षवेधी ठरली आहे. भाजपकडून लढत असलेल्या मंडाविया यांची लढत कॉंग्रेसच्या ललितभाई वसोया यांच्याशी होत आहे. पोरबंदरमध्ये तिसऱ्या टप्प्यात म्हणजे ७ मे रोजी मतदान होत आहे. गत निवडणुकीत या ठिकाणी भाजपच्या रमेशभाई धाडूक यांनी ललित वसोया यांचा २ लाख २९ हजार मतांनी पराभव केला होता. धाडूक यांना ५ लाख ६३ हजार तर वसोया यांना ३ लाख ३४ हजार मते पडली होती.
गुजरातच्या पश्चिम भागात असलेले पोरबंदर महात्मा गांधी यांचे जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. २०११ च्या जनगणनेनुसार पोरबंदरची लोकसंख्या सहा लाख इतकी आहे. येथील पुरुष साक्षरता दर ७५.७८ टक्के तर महिला साक्षरता दर ६७.७५ टक्के इतकी आहे. १९७७ मध्ये झालेल्या पोरबंदरच्या पहिल्या निवडणुकीत भारतीय लोकदलाचे उमेदवार धर्मसिंह पटेल यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर १९८० पहिल्यांदा कॉंग्रेसने आपले खाते उघडले.
मनसुख मंडाविया यांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक असल्याने भाजपने ताकद पणास लावली आहे. मंडाविया यांनी २००२ रोजी पालिताना विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर २०१२ आणि २०१८ मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले होते. कॉंग्रेसचे ललित वसोया हे धोराजी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. प्रदेश कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष अर्जुन मोडवाडिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने वसोया यांची विजयासाठी संघर्ष करावा लागणार आहे.
दोन किलोमीटरचा रोड शो करीत मंडाविया यांनी उमेदवारी अर्ज भरला. या वेळी त्यांच्यासोबत मोडवाडिया हेही हजर होते. देशातील अन्य मतदारसंघाप्रमाणे वाढती बेरोजगारी ही पोरबंदरची सर्वात मोठी समस्या आहे. अरबी समुद्र लागून असल्याने या ठिकाणी मच्छीमारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मच्छीमारीचा वाढता खर्च, बोटी नांगरण्यासाठी आवश्यक सुविधा नसणे या समस्या ‘जैसे थे’ आहेत. पायाभूत सुविधांच्या अभावामुळे अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत पोरबंदर मागासले आहे.
निवडून आल्यास या समस्या सोडवू, असे आश्वासन मंडाविया सभांद्वारे देत आहेत. तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी Narendra Modi यांना पंतप्रधान बनविण्यासाठी भाजपला निवडून द्यावे, असे आवाहनही ते मतदारांना करीत आहेत. केंद्रात मंत्री असल्याने आणि कोरोना काळात चांगले काम केले असल्याने मंडाविया यांना विजय मिळवण्यात अडचण येणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. अशा स्थितीत प्रबळ उमेदवार नसणे, ही विरोधकांसाठी मोठी डोकेदुखी आहे. पोरबंदरमधील मतदारसंख्या चार लाख इतकी आहे. यात १.७ लाख मतदार कोळी (ओबीसी), दीड लाख मतदार मेर (ओबीसी), १.३५ लाख मतदार दलित, १.२३ लाख मतदार मुस्लिम, एक लाख मतदार अहिर तर ५० हजार मतदार खारवा समाजाचे आहेत. या ठिकाणी कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.