
Rajasthan Congress updates : मागील काही वर्षांत अनेक बडे नेते काँग्रेसला सोडून गेले. तर काही राज्यांत नेत्यांमधील मतभेद आणि गटबाजीने पक्षाला सत्तेपासून दूर राहावे लागले. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे हरियाणा. त्याचप्रमाणे राजस्थानही त्यास अपवाद ठरत नाही. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील टोकाचे मतभेद जगजाहीर आहेत. त्याबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे.
गेहलोत आणि पायलट यांच्यातील मतभेदाचा फटका काँग्रेसला बसला आहे. गेहलोत मुख्यमंत्री असताना पायलट यांनी सरकारविरोधात बंड पुकारल्याचा दावाही त्यांनी केला होता. हे प्रकरण दिल्लीत हायकमांडपर्यंत पोहचले होते. त्यावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. अखेर गेहलोत यांनी गुरूवारी त्यावर पडदा टाकला आहे.
बिकानेर येथे मीडियाशी बोलताना गेहलोत यांनी पायलट यांच्याशी असलेल्या मतभेदांबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले, माझ्या मते कोणतेही मतभेद आणि दुरावा नाही. राजस्थानात पक्षात कोणतीही गटबाजी नाही. जुन्या घटना लक्षात ठेवल्या तर दुसरे काम आम्ही कसे करू? जुन्या गोष्टी विसराव्या लागतात. काँग्रेस मजबूत झाली तर देश वाचवू शकू, असे गेहलोत यांनी स्पष्ट केले.
बिकानेरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावलेल्या फलकांवर गेहलोत यांच्याव्यतिरिक्त पायलट यांचे फोटो लागलेले दिसत नाहीत. या प्रश्नावर बोलताना गेहलोत म्हणाले, एवढ्या छोट्या गोष्टी बोलू नका. अनेक ठिकाणी माझेही फोटो नसतात. कार्यकर्त्याने कुणाचा फोटो लावला, कुणाचा लावला नाही, या फोटो-वोटोच्या चक्करमध्ये मी पडत नाही.
अशोक गेहलोत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेस पुढील २० वर्षे सत्तेत येणार नाही, असे विधान अमित शहांनी लोकसभेत केले होते. त्यावर बोलताना गेहलोत म्हणाले, देवाच्या कृपेने त्यांना उदंड आयुष्य मिळो. ते असतानाच काँग्रेसची सत्ता येईल. एकदा भैरोसिंह शेखावत म्हणाले होते की, मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला सत्तेत येऊ देणार नाही. योगायोगाने आठ महिन्यांत मीच मुख्यमंत्री झालो. ही बाब मी त्यांना सभागृहात ऐकवली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.