Congress News : अदानींवरून मोदींची डोकेदुखी वाढली, काँग्रेस दररोज करणार 'ही' कृती..

Jayram Ramesh : काँग्रेस दररोज अदानी प्रकरणावरून तीन प्रश्न विचारणार!
Congress News : Jayram Ramesh : Naredra modi
Congress News : Jayram Ramesh : Naredra modi Sarkarnama
Published on
Updated on

Congress News : उद्योगपती गौतम अदानी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या निशाण्यावर आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. अमेरिकन हिंडेनबर्गच्या अहवालानंतर गौतम अदानी यांच्या संपत्तीत सातत्याने घट होत आहे. यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

मोदी सरकारच्या मेहरबानीमुळे अदानींच्या संपत्तीत वाढ झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आता काँग्रेस पक्षाने या प्रकरणी दररोज तीन प्रश्नांची मालिका सुरू केली आहे. आणि या अभियानाला हम अदानी के है कौन? असे नाव देण्यात आले आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

काँग्रेसने प्रश्नल उपस्थित केले आहेत :

जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "अदानी महामेगा घोटाळ्यावर पंतप्रधानांच्या मौनामुळे आम्हाला 'हम अदानी के हैं कौन' ही मालिका सुरू केली आहे. आम्ही आजपासून मोदींना दररोज 3 प्रश्न विचारणार आहोत." यामध्ये पहिला प्रश्न गौतम अदानी यांचे भाऊ विनोद अदानी यांच्याशी संबंधित विचारला. दुसऱ्या प्रश्नात त्यांनी विचारले की, गौतम अदानी यांच्यावर ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सने काय कारवाई केली?

Congress News : Jayram Ramesh : Naredra modi
Foreign Visits of Top Leaders: बापरे! पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर कोट्यावधींचा खर्च; आकडा बघुन तुम्हालाही बसेल धक्का...

जयराम रमेश यांचा सरकारला टोला :

यापूर्वी जयराम रमेश यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, "कोट्यवधी भारतीयांच्या बचतीच्या पैशांचा नाश करणाऱ्या अदानी मुद्द्यावर विरोधकांनी जेपीसीची (संयुक्त समिती) मागणी केल्याने, संसद आणखी एक दिवसासाठी तहकूब करण्यात आली.

Congress News : Jayram Ramesh : Naredra modi
Satyajit Tambe News : सत्यजीत तांबेंचे पटोलेंवर आरोप; 'थोरातांनी आता बोललं पाहिजे : 'काय घडले हे फक्त...'
Congress News : Jayram Ramesh : Naredra modi
K. Chandrashekhar Rao : 'अब की बार किसान सरकार' : केसीआर यांचा महाराष्ट्रात येऊन एल्गार!

सरकारची प्रतिक्रिया :

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, "सरकारचे एजन्सी यावर काम करत आहेत. रिझर्व्ह बँकस्वायत्त आहे आणि ते काय निर्णय घेतात यावर ते अवलंबून आहे." ते म्हणाले, "बाजारांचे नियमन करण्यासाठी आणि वर्चस्व राखण्यासाठी, सेबीला अधिकार आहेत. अदानी समूहाच्या मंदीमुळे देशाच्या स्थूल आर्थिक मूलभूत गोष्टींवर किंवा तिच्या प्रतिष्ठेवर कोणताही परिणाम झालेला नाही"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com