Delhi Politics : सावरकरांवरून वाद पेटला; दिल्लीशी त्यांचा काय संबंध? काँग्रेसचा संताप

Veer Sawarkar PM Narendra Modi Congress Delhi University : दिल्ली विद्यापीठातील एका कॉलेजला सावरकरांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  
Veer Savarkar, Delhi Univrsity
Veer Savarkar, Delhi UnivrsitySarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी दिल्लीत विविध विकासकामांचे लोकार्पण करणार आहेत. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या एका कॉलेजचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, त्याआधीच वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने कॉलेजला सावरकरांचे नाव देण्यावर आक्षेप घेतला आहे. सावरकरांचा दिल्लीशी काही संबंध नसल्याचे विधान काँग्रेस नेत्याने केले आहे.

दिल्ली विद्यापीठातील एका कॉलेजला सावरकरांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकारण तापले आहे. काँग्रेसने या कॉलेजला सावरकरांऐवजी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. त्यांचे नुकतेच निधन झाले आहे.

Veer Savarkar, Delhi Univrsity
Amit Shah : आता काश्मीरचंही नाव बदलणार?; अमित शहांच्या 'त्या' वक्तव्याने चर्चांना उधाण!

काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी म्हणाले, सावरकरांचा दिल्ली आणि परिसराशी काही संबंध नाही. दिल्लीत अनेक क्रांतीकारक आणि स्वातंत्र्यसेनानी होऊन गेले आहेत. दिल्लीतील निवडणुकीच्या पाश्वभूमीवर भाजप ध्रुवीकरणाचा विचार करत आहे. कॉलेजला मनमोहन सिंग यांचे नाव द्यायला हवे. ते मोठे शिक्षणतज्ज्ञही होते.

‘एनएसयूआय’ने पंतप्रधान मोदींना पत्र लिहून कॉलेजला मनमोहन सिंग यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौधरी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. मनमोहन सिंग यांनी आयआयटी, आयआयएम, एम्स यांसारख्या अनेक शिक्षण संस्थांची उभारणी केली. केंद्रीय विद्यापीठ कायदा केला. त्यामुळे शिक्षणसंस्थांना त्यांचे नाव दिल्यास तरुणपिढीला प्रेरणा मिळेल, असे पत्रात म्हटले आहे.

Veer Savarkar, Delhi Univrsity
Mamta Banerjee on BSF : ''बांगलादेशींना घुसखोरीसाठी 'BSF'कडून मदत'' ; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप!

भाजपचा पलटवार

भाजपने कॉलेजला सावरकरांचे नाव देण्यावरून विद्यापीठाचे समर्थन केले आहे. तर काँग्रेसवर निशाणा साधला आहे. दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले, वीर सावरकर हे स्वातंत्र्यसेनानी होते. दिल्ली विद्यापीठाने त्यांचे नाव कॉलेजला देण्याचा निर्णय घेतला असेल तर तर त्याचे स्वागत आहे. काँग्रेससाठी कोणते नेते आदरणीय आहेत, हे त्यांनाच माहिती आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com