Mallikarjun Kharge : सिद्धरामय्या गोत्यात, खर्गेंनी घेतला धसका; पाच एकर जमिनीबाबत मोठा निर्णय

Siddaramaiah Rahul Kharge MUDA ED Action : मल्लिकार्जून खर्गे यांचे पुत्र राहुल यांच्या संस्थेला सरकारकडून पाच एक जमीन मिळाली होती.
Mallikarjun Kharge
Mallikarjun KhargeSarkarnama
Published on
Updated on

Karnataka News : कर्नाटकात सध्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कथित जमीन घोटाळ्यावरून मोठे राजकीय वादळ उठले आहे. लोकायुक्त पोलिसांसह ईडीकडूनही या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा धसका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनीही घेतला आहे.

खर्गे आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या सिध्दार्थ विहार ट्रस्टला मिळालेली पाच एकर जमीन परत करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हैसूर शहरी विकास प्राधिकरमातील (MUDA) कथित जमीन घोटाळ्याची चौकशी सुरू असतानाच खर्गेंनी हा निर्णय घेतल्याने आता चर्चांना उधाण आले आहे.

Mallikarjun Kharge
Rahul Gandhi : नाशिकमधील घटनेनंतर राहुल गांधींचा मोदी सरकारवर प्रहार; पुन्हा ‘जय जवान’चा नारा

खर्गे यांचे पुत्र राहुल खर्गे हे ट्रस्टचे कामकाज पाहतात. या ट्रस्टला कर्नाटक औद्योगिक विकास मंडळाने पाच एकर जमीन दिली होती. त्यावरूनही वाद निर्माण झाला आहे. ही जमीन कर्नाटकातील हायटेक-डिफेन्स एरोस्पेस पार्कमध्ये दिली गेली होती. विशेष म्हणजे सिद्धरामय्या यांनीही गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्याकडील जमीन परत केली आहे.

सिध्दार्थ विहार ट्रस्टला मार्च 2024 मध्ये कर्नाटक सरकारने अनुसूचित जाती प्रवर्गासाठीच्या एका योजनेतून पाच एकर जमीन ट्रस्टला दिली होती. तेव्हापासून वाद सुरू झाला होता. सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू असल्याची टीका भाजप नेत्यांकडून करण्यात आली होती. ट्रस्टमध्ये मल्लिकार्जून खर्गेंसह त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचाही समावेश आहे.

Mallikarjun Kharge
Ratan Tata : रतन टाटांच्या निधनाने इस्त्रायलचे पंतप्रधानही भावूक; मोदींना पाठवला खास संदेश

सिध्दरामय्या यांच्या जमिनीचा वाद वाढल्यानंतर टॅस्टने 20 सप्टेंबरला मंडळाला पत्र लिहून जमीन परत घेण्याचा विनंती केली होती. याबाबत मल्लिकार्जून खर्गेंची पूत्र व मंत्री प्रियांक खर्गे यांनीच माहिती दिली आहे. ही जमीन कौशल्य विकासासाठी देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?

सिध्दार्थ विहार ट्रस्ट ही शैक्षणिक, सांस्कृतिक आणि चॅरिटेबल टॅस्ट आहे. ही खासगी किंवा कुटुंबाची ट्रस्ट नाही. ट्रस्ट अंतर्गत असलेल्या सर्व संस्था नफा कमवण्यासाठी नाहीत. चॅरिटेबल टॅस्ट असल्याने त्याचा कोणत्याही विश्वस्ताही काही आर्थिक लाभ मिळत नाही. ट्रस्टशी संबंधित विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील कौशल्य विकास आणि संशोधनाचा अनुभव मिळावा, हे जमीन घेण्यामागचे मुख्य कारण होते, असा खुलासा खर्गे यांनी केला आहे.

केवळ अलॉटमेंट लेटर देण्यात आले असून अद्याप कागदोपत्री हस्तांतरणाची कार्यवाही झालेली नाही. ही जमीन मिळवण्यासाठी ट्रस्ट पूर्णपणे पात्र होती. पण कोणतीही शैक्षणिक संस्था राजकीय हेतूने प्रेरित होऊन केलेल्या निराधार आरोपांशी सामना करत चालू शकत नाही. त्यामुळे जमीन परत घेण्याचे पत्र लिहिले आणि त्यानुसार केलेली अलॉटमेंट रद्द करण्यात आल्याचे पत्र मंडळाने 29 सप्टेंबरला दिल्याची माहिती खर्गेंनी दिली आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com