Mallikarjun Kharge Letter : ...म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मल्लिकार्जुन खर्गेंनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र!

Congress Vs BJP : जाणून घ्या, या दोन पानी पत्रात खर्गेंनी असं नेमकं काय म्हटलं आहे?
Narendra Modi, Mallikarjun Kharge
Narendra Modi, Mallikarjun KhargeSarkarnama

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना प्रमुख विरोधी पक्षाचे अध्यक्ष म्हणजे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन पानी पत्र पाठवलं आहे. ज्याची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडलेला असताना आणि देशभरातील राजकीय वातावरण तापलेलं असताना खर्गेंचा हा पत्रप्रपपंच समोर आला आहे.

पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्राद्वारे काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी व्यक्तिगतरित्या आपल्या पक्षाचे न्यायपत्र समजावून सांगण्यासाठी वेळ मागितली आहे. दोन पानी पत्रात खर्गेंनी लिहिले आहे की, मागील काही दिवसांमधील पंतप्रधान मोदींच्या भाषणामुळे त्यांना अजिबात धक्का बसला नाही किंवा आश्चर्यही वाटले नाही.(Mallikarjun Kharge wrote a letter to Narendra Modi)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi, Mallikarjun Kharge
Manish Kashyap : यूट्यूबर मनीष कश्यप यांचा भाजपामध्ये प्रवेश; म्हणाले 'आईचा शब्द टाळू शकत नाही'

मल्लिकार्जुन खर्गे पत्रात म्हणतात, 'मागील काही दिवसांपासून तुमच्या भाषणांमुळे मला धक्काही बसला नाही आणि आश्चर्यही वाटले नाही. निवडणुकीतील पहिल्या टप्प्यामधील भाजपाची स्थिती लक्षात घेता, तुम्ही आणि तुमच्या पक्षाचे नेते असंच म्हणतील, याचा अंदाज होताच. काँग्रेस नेहमीच वंचित गरीब आणि त्यांच्या अधिकारांबाबत बोलत आली आहे. आम्हाला माहीत आहे की तुम्हाला आणि तुमच्या सरकारला गरिबांची काहीच चिंता नाही.'

याचबरोबर खर्गे(Mallikarjun Kharge) म्हणाले, की काँग्रेस समाजातील वंचित घटकास, गरिबांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तुमचे सूटबूट सरकार केवळ कॉर्पोरेट्ससाठी काम करते, ज्यांचे कर तुम्ही कमी केले आहेत. मात्र पगारदार व्यक्तीला जास्त कर भरावा लागत आहे. गरिबांनाही अगदी अन्न आणि मिठासाठी जीएसटी भरावा लागलत आहे. मात्र कॉर्पोरेटवाल्यांना जीएसटी रिफंडची सुविधाही मिळत आहे.

त्यामुळे आम्ही जेव्हाही गरीब आणि श्रीमंत यांच्यातील असमानतेबद्दल बोलतो, तेव्हा तुम्ही ते हिंदू-मुस्लिमाशी जोडतात. आमचे घोषणापत्र भारताच्या लोकांसाठी आहे, मग ते हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिचन किंवा जैन असतील. मला वाटतं की तुम्ही अद्यापही तुमचे स्वातंत्र्यपूर्व मित्र मुस्लिम लीग आणि वसाहतवादी शक्तींना विसरला नाहीत.

Narendra Modi, Mallikarjun Kharge
Lok Sabha Election 2024 : दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान; राज्यातील 8 जागांसह देशभरातील 88 जागांचा 'फैसला' होणार...

याशिवाय खर्गे यांनी असेही म्हटले की, काँग्रेसने नेहमीच गरिबांना सशक्त करण्याचा प्रयत्न केला आहे, तर भाजपने(BJP) केवळ गरिबांना लुटले आहे. तसेच पत्रात असेही म्हटले आहे की, तुमचे सरकार असे आहे ज्याने नोटाबंदीचा वापर संघटित लूट आणि कायदेशीर लूट म्हणून केला. या काळात गरिबांनी जमा केलेले पैसे कर्जाच्या रूपात श्रीमंताकडे हस्तांतरित केले. 2014 पासून तुमच्या सरकारने जी कर्ज माफ केली आहेत, ती सर्व संपत्ती गरिबांकडून श्रीमंताकडे हस्तांतरित झाली आहे. ना तुम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, ना कारागिरांचे, ना तुमच्या सरकारने विद्यार्थ्यांचे कर्ज माफ केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com