Congress News : काँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट; खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधींनी मांडली कैफियत

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोनिया गांधी पहिल्यांदाच पत्रकार परिषदेला उपस्थित होत्या. त्यामुळे या मुद्द्याचे गांभीर्य वाढल्याचे बोलले जात आहे.
Sonia Gandhi, Mallikarjun Kharge, Rahul Gandhi
Sonia Gandhi, Mallikarjun Kharge, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससमोर आर्थिक संकट उभे ठाकल्याचे आज स्पष्ट झाले. प्राप्तीकर विभागाकडून काँग्रेसची (Congress News) बँक खाती गोठवण्यात आल्यानंतर आज पहिल्यांदाच पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मीडियासमोर आपली कैफियत मांडली. मोदी सरकारकडून जाणीवपूर्वक काँग्रेसची आर्थिक कोंडी केला जात असल्याचा आरोप या नेत्यांनी केला आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी (Sonia Gandhi) पहिल्यांदाच मीडियाला सामोरे गेल्या. त्यामुळे या मुद्द्याचे गांभीर्य समोर मांडण्यासाठी त्या स्वत: उपस्थित राहिल्याने पक्षाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसे स्पष्ट संकेतच या नेत्यांनी मीडियासमोर दिल

Sonia Gandhi, Mallikarjun Kharge, Rahul Gandhi
Congress News : काँग्रेसकडून तीन राज्यांत भाजपला झटका; आमदार, माजी मंत्र्यांचा पक्षप्रवेश

खर्गे (Mallikarjun Kharge) म्हणाले, लोकशाहीसाठी निष्पक्ष निवडणूक गरजेची आहे. पण सध्या सत्ताधाऱ्यांचीच एकाधिकारशाही दिसत आहे. सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) आदेशानंतर इलेक्ट्राेल बाँडमधून समोर आलेली तथ्यं चिंताजनक आहेत. देशाच्या प्रतिमेला धक्का लागला आहे. मागील 70 वर्षे निवडणुका निष्पक्षपणे पार पडल्या. आता त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सत्ताधारी पक्षाच्या खात्यात हजारो कोटींहून अधिक रक्कम जमा झाली, तर दुसरीकडे मुख्य विरोधी पक्षाचे बँक खाती गोठवण्यात आली आहेत. आम्हाला पैशांच्या अभावामुळे ताकदीने निवडणूक लढवता येऊ नये, यासाठी हे षडयंत्र केले जात आहे. सत्ताधाऱ्यांचा हा खतरनाक खेळ आहे. त्याचे दूरगामी परिणाम होतील, असा आरोपही खर्गे यांनी केला. राजकीय पक्षांना प्राप्तीकर नसतानाही केवळ काँग्रेकडून कर वसूल केला जात आहे. भाजपने (BJP) कधीच कर भरला नाही, असा दावाही त्यांनी केला.

सोनिया गांधींचाही प्रहार

सोनिया गांधी यांनीही सरकारवर निशाणा साधला. हा केवळ काँग्रेससाठी धोक्याचा इशारा नाही, तर संपूर्ण लोकशाहीसाठी धोकादायक आहे. आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, पण पंतप्रधान काँग्रेसला अपंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे खूपच गंभीर असून लोकशाहीवर हल्ला असल्याची टीका सोनिया गांधींनी केली. राहुल गांधींनीही मोदी सरकारला धारेवर धरले.

काय आहे प्रकरण?

काँग्रेसकडे कर थकीत असल्याने त्याच्या वसुलीसाठी प्राप्तीकर विभागाने काँग्रेसची बँक खाती गोठवली आहेत, असा दावा पक्षाकडून केला जात आहे. पक्षाला निधी वापरता येत नाही. प्रचारासाठी पैसे उपलब्ध होत नाहीत. आमच्याविरोधातील 30 ते 35 जुनी प्रकरणे उकरून काढत पैसा वापरला दिला जात नाही, असा आरोप माकन यांनी केला.

R

Sonia Gandhi, Mallikarjun Kharge, Rahul Gandhi
Lok Sabha Election 2024 : पल्लवी पटेलांनी वाढवली अखिलेश यांची डोकेदुखी; तीन उमेदवार जाहीर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com