Delhi News : महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याची जोरदार चर्चा होत आहे. पटोले आणि चव्हाण दोघाही नेत्यांची दिल्लीवारी सुरू आहे. अशोक चव्हाण यांनी नुकचाच दिल्लीचा दौरा केल्यानंतर त्यांच्यापाठोपाठ आता पटोलेंनीही दिल्लीवारी केली. दोन दिवसांपासून पटोले दिल्लीत ठाण मांडून आहेत. यामुळे प्रदेशाध्यपदी मोठा निर्णय काँग्रेसकडून घेतला जाणार, अशी शक्यता आहे. (Latest Marathi News)
प्रदेशाध्यक्षपदासाठी अशोक चव्हाणांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत, तर प्रदेशाध्यक्षपदी कायम राहण्यासाठी पटोलेंची धावपळ सुरू आहे, अशी चर्चा दिल्लीसोबतच राज्यातही सुरू आहे. अंतिम निर्णय काँग्रेसचे नेते राहुल गांधीच घेतील, यामुळे प्रदेशाध्यक्षपद पटोले टिकवणार की अशोक चव्हाणबाजी मारणार याची चर्चा सुरू आहे.
नाना पटोले हे दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये आहेत. नुकतीच अशोक चव्हाण यांचीही दिल्लीवारी झाली होती. दोन दिवसीय दौऱ्यात चव्हाण यांनी काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची गाठीभेटी घेतल्याचे वृत्त आहे. यानंतर लगोलग नाना पटोलेदेखील दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे कुठेतरी प्रदेशाध्यपदी कायम राहण्यासाठी पटोले प्रयत्न करत आहेत का? अशी चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे चव्हाण आणि पटोले यांचे समर्थकही दिल्लीत दाखल झाले होते. काहींनी नाराजीचा तर काहींनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सूर आवळला होता.
काही राज्यात काँग्रेसकडून नुकतचे पदाधिकारी बदलण्यात आले होते. तसेच, मुंबई शहर अध्यक्षपदी असलेले भाई जगताप यांची उचलबांगडी करून, त्यांच्या जागी माजी मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे अध्यक्षपद देण्यात आले. या बदलांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येणार, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते विजय वड्डेवट्टीवार, सुनील केदार (Sunil Kedar) आणि शिवाजीराव मोघे या विदर्भातील तीन दिग्गज नेत्यांनी आघाडी उघडली आहे.पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेत, पटोले यांना बदलण्याची थेट मागणी त्यांनी केली होती. कॉंग्रेसचे मुंबईतील नेते संजय निरूपमदेखील त्यांच्यासोबत होते.
तर काँग्रेसमधील काही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींशी भेट घेऊन, पटोले यांनाच अध्यक्षपदी कायम ठेवण्याची मागणी केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समर्थनार्थ काही काँग्रेस नेत्यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. नागपूरातील, तसेच राज्यातील काही नेत्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि सचिव मुकुल वासनिक यांची भेट घेतली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदारविकास ठाकरे, नवनिर्वाचितआमदार धीरज लिंगाडे, म्युझीब पठान, उमाकांत अग्निहोत्री इत्यादी नेते त्यांच्या समर्थनात आहेत.
अशोक चव्हाण हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते आहेत. त्यांनी काँग्रेस संघटनेत दीर्घकाळापासून काम केले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ते राहिलेले आहेत. तसेच, त्यांना खासदारकीचा अनुभवही आहे. यापूर्वी काही काळासाठी चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदी सुद्धा काम केलेले आहे. यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेतला गेला तर, प्राधान्याने चव्हाणांची निवड होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.