BMC Scam: बीएमसी सहाय्यक आयुक्त स्कॅम प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर; 'त्या' 100 अधिकाऱ्यांना अडकवण्याचा होता 'प्लॅन'

BMC Corruption News: संबंधित सहाय्यक आयुक्त महापालिकेत अधिकारी असल्याने काही अधिकाऱ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. काळा पैसा गुंतवणारे अधिकारी भविष्यात तक्रार करणार नाहीत. केलीच तर आपले वलय वापरून त्यातून निसटू, असा विचार करून या सहाय्यक आयुक्ताने ही योजना अनेकांच्या गळी उतरवली असावी.
BMC Scam .jpg
BMC Scam .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मुंबई महापालिकेतील सहाय्यक आयुक्ताने वांद्रे येथील पुनर्विकास प्रकल्पातील गुंतवणुकीची योजना केंद्र आणि राज्य शासनातील सुमारे १०० हून अधिक अधिकाऱ्यांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न केला होता; मात्र काही सतर्क अधिकारी या जाळ्यातून थोडक्यात निसटले, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सहाय्यक आयुक्तांच्या शब्दावर आणि हमीवर विश्वास ठेवत पैसे गुंतवल्याची प्रतिक्रिया या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींनी ‘सकाळ’कडे नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर नोंदविली.

हा विषय सर्वांना माहिती आहे, अशी प्रतिक्रिया नोंदवत राज्य पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी पुढे म्हणाला, की गेल्या काही महिन्यांपासून मुंबई महापालिकेतील (BMC) संबंधित सहाय्यक आयुक्ताने पुनर्विकास प्रकल्पात 100 टक्के रक्कम आगाऊ दिल्यास घर, व्यावसायिक गाळे अगदी स्वस्तात पडतील.

भविष्यात इमारत बांधून तयार होईपर्यंत ही गुंतवणूक दुप्पट होईल, अशी योजना घेऊन १००हून अधिक अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या; मात्र त्यातील बहुतांश अधिकाऱ्यांनी तत्पूर्वीच या प्रकल्पाबाबत माहिती घेतल्याने ते वेळीच सतर्क झाले. त्यामुळे अनेक जण त्याच्या जाळ्यातून निसटले.

दरम्यान, याबाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच आपला निर्णय योग्य होता, असे म्हणत अनेकांनी निःश्वास सोडला, अशी मिश्किल प्रतिक्रियाही या अधिकाऱ्याने नोंदवली.

BMC Scam .jpg
Maharashtra Vs Bihar Election Result : महाराष्ट्र अन् बिहारच्या निकालात एवढे साम्य की...; ‘हे’ 6 फॅक्टर वाचा अन् तुम्हीच ठरवा...

संबंधित सहाय्यक आयुक्त महापालिकेत अधिकारी असल्याने काही अधिकाऱ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. काळा पैसा गुंतवणारे अधिकारी भविष्यात तक्रार करणार नाहीत. केलीच तर आपले वलय वापरून त्यातून निसटू, असा विचार करून या सहाय्यक आयुक्ताने ही योजना अनेकांच्या गळी उतरवली असावी, असा अंदाज एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तविला.

याबाबत संबंधित सहाय्यक आयुक्ताकडे विचारणा केली असता, माझीच कायदेशीररीत्या २५ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. पटेलने आपल्यासह अनेकांची फसवणूक (Fraud) केल्याचा दावा त्याने केला. दरम्यान, ‘सकाळ’च्या वृत्ताने विविध शासकीय विभागांमध्ये खळबळ उडाली आहे.

BMC Scam .jpg
Jaykumar Gore : पंढरपुरात मध्यरात्रीपर्यंत मोठ्या घडामोडी; संजयमामा, साळुंखे, बागल पालकमंत्र्यांच्या भेटीला, परिचारक-गोरे-आवताडेंमध्ये खलबतं!

चौकशीस पाचारण, जबाब नाही!

तक्रारदार निशित पटेल यांना गुरुवारी खार पोलिस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले; मात्र त्यांचा जबाब नोंदवण्यात आला नाही. जबाब नंतर नोंदवण्यात येईल, असे सांगत त्यांना माघारी पाठविण्यात आले. याबाबत परिमंडळ नऊचे उपआयुक्त दीक्षित गेडाम यांच्याकडे माहिती विचारली असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com