
थोडक्यात महत्वाचे :
राहुल गांधी यांनी ‘वोट चोरी’विरोधात नवी वेबसाईट सुरू करून देशभर मोहिमेला सुरुवात केली.
मोहिमेत सहभागी होण्यासाठी 9650003420 या क्रमांकावर मिस्ड कॉल देण्याचे आणि वेबसाईटवर नोंदणी करण्याचे आवाहन केले.
सहभागी नागरिकांना डिजिटल प्रमाणपत्र देऊन लोकशाही रक्षणासाठी एकजूट दाखवली जात आहे.
Rahul Gandhi’s Appeal : काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून वोट चोरीविरोधात जोरदार मोहीम उघडण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून विविध व्यासपीठांवरून ते महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये वोट चोरी झाल्याचा आरोप भारतीय निवडणूक आयोगावर करत आहेत. मतदारयाद्यांमधील घोळाचे पुरावे देत त्यांनी नुकतीच आयोगाच्या कारभाराची चीरफाड केली. आता त्यांनी नवी मोहिम हाती घेतली आहे.
राहुल गांधी यांनी ‘वोट चोरी’विरोधात एक नवी वेबसाईटस सुरू केली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून मोहिम सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी देशवासियांना केले आहे. त्यांनी सोशल मीडियात एक पोस्ट करत मोहिमेला समर्थन मागितले आहे. एक एक मोबाईल क्रमांकही जारी करण्यात आला आहे.
राहुल यांनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मतदान चोरी म्हणजे ‘एक व्यक्ती, एक मतदान’ या लोकशाहीच्या मुळ सिध्दांतावरच हल्ला आहे. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी त्रुटीविरहित मतदारयादी आवश्यक आहे. निवडणूक आयोगाकडे आमची स्पष्ट मागणी आहे की, पारदर्शकता दाखवा आणि डिजिटल मतदारयाद्या सार्वजनिक करा. जेणेकडून जनता आणि राजकीय पक्ष त्याचे स्वत:च ऑडिट करू शकतील.
आमच्यासोबत येत या मागणीचे समर्थन करा, असे आवाहन करताना राहुल गांधी यांनी http://votechori.in/ecdemand ही वेबसाईट सुरू केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी 9650003420 हा मोबाईल क्रमांक जारी करत मिस्ड कॉल देण्याचे आवाहन केले आहे. ही लढाई लोकशाहीच्या रक्षणासाठी असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.
मोहिमेत सहभागी झालेल्यांना नोंदणी केल्यानंतर एक प्रमाणपत्रही मिळत आहे. यामध्ये संबंधित व्यक्तीचे नाव आणि मी वोट चोरीविरोधात असून मी राहुल गांधी यांच्या मागणीचे सर्थन करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यावर काँग्रेसच्या चिन्हासह पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, महासचिव के. सी. वेणुगोपाल आणि खजिनदार अजय माकन यांच्या सह्या आहेत.
काँग्रेसचे अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी हे प्रमाणपत्र सोशल मीडियात पोस्ट करत नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, राहुल यांनी पत्रकार परिषदेत मांडलेल्या मुद्दयांची सविस्तर माहितीही वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मतदान चोरीबाबतचा अनुभव व्यक्त करण्यासाठीही स्वतंत्र टॅग उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Q1: राहुल गांधींच्या नव्या मोहिमेचे नाव काय आहे?
A: वोट चोरीविरोधातील मोहीम.
Q2: मोहिमेत सहभागी होण्यासाठी काय करावे लागेल?
A: वेबसाईटवर नोंदणी किंवा 9650003420 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा.
Q3: मोहिमेत नोंदणी केल्यावर काय मिळते?
A: नावासह डिजिटल प्रमाणपत्र.
Q4: मोहिमेचा मुख्य उद्देश काय आहे?
A: पारदर्शक, त्रुटीविरहित आणि सार्वजनिक डिजिटल मतदारयादीची मागणी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.