Election Commissions Vote Theft : राहुल गांधी प्रचंड आक्रमक होताच निवडणूक आयोगाची 'नवी खेळी'; महाराष्ट्र, बिहाराच्या मतदारयाद्याच गायब?

Election Commissions Rahul Gandhi : निवडणूक आयोगावर राहुल गांधी यांनी गंभीर आरोप करत बोगस मतदारांच्याद्वारे मतचोरी होत असल्याचे म्हटले आहे. प्रश्नांना उत्तर न देता आयोगने वेबसाईट बंद केल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे.
Election Commission, Rahul Gandhi
Election Commission, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Vote Theft News : कर्नाटकमधील महादेवपूरा मतदारसंघात तब्बल एक लाख 250 बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली. बोगस मतदारांद्वारे निकाल बदलण्यात आला, असे गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. बोगस मतदारांच्या नोंदणीबाबत राहुल गांधी प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी थेट मतदार याद्यांद्वारे पुरावेच सादर केले. एकाच घरात 80 मतदार राहत असल्याचे त्यांनी समोर आणले.

राहुल गांधींनी थेट निवडणूक आयोग मत चोरी करत असल्याचा आरोप केल्याने मोठी खबळबळ उडाली. निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांनी केलेले आरोप सत्य आहेत असे प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे प्रत्युत्तर दिले. दरम्यान, राहुल यांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाईट बंद केली तसेच महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेशाच्या मतदार याद्या गायब केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

राहुल गांधी म्हणाले, आम्ही दिलेल्या डेटाबाबत लोक निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर प्रश्न विचारत आहे तर आयोगाने त्यांची वेबसाईट बंद केली. मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान या वेबसाईट बंद केल्या आहेत. त्यांना माहीत आहे की या डेटा संदर्भात प्रश्न विचारले तर त्यांचा संपूर्ण ढाच्या कोसळेल.

Election Commission, Rahul Gandhi
Eknath Shinde : "ते अनुभवी पण, आमची वाटचाल..."; दिल्लीवारी अन् शरद पवारांच्या 'त्या' सूचक वक्तव्यावर अखेर एकनाथ शिंदे बोलले

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेशाच्या मतदारयाद्या गायब केल्याचा आरोप केलाय. दरम्यान, निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, हरियाण निवडणूक आयोगाची वेबसाईट बंद नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

एकाच बापाची 42 मुलं...

मतदार याद्यांचा हवाल देत जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, रामकमलदास याला 80 पोरं. म्हणजे त्याच्या बायकोला एका वर्षात तीन पोरं झाली. मी ती यादी ट्विट देखील केली आहे. एकाच बापाची 42 पोरं , वय सगळ्यांचे 29 ते 67 च्या आसपास आहेत. अनेक पोरं एकाच वर्षी जन्माला काढून रामकमलदासने विश्वविक्रम केला आहे. निवडणूक आयोग खूपच पराक्रमी निघाला, असा टोला देखील आव्हाड यांनी लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com