Rahul Gandhi Marriage : राहुल गांधी लग्न कधी करणार ? शेतकरी महिलेच्या प्रश्नावर सोनिया गांधी म्हणाल्या, " तुम्हीच मुलगी शोधा"

10 Janpath Delhi : महिला शेतकऱ्यांनी आपल्या सोबत गावरान पद्धतीचे जेवण गांधी परिवासाराठी आणले होते.
10 Janpath Delhi
10 Janpath Delhi Sarkarnama

Congress : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या लग्नाबाबत नेहमीच चर्चा सुरु असते. एका शेतकरी महिलेने सोनिया गांधींना राहुल गांधी लग्न कधी करणार ? असा थेट प्रश्न विचारल्याने पुन्हा हा विषय चर्चेत आला आहे. राहुल गांधींनी याबाबतच्या व्हिडिओ शेअर केला आहे.

सोनीपत (हरियाणा) येथील काही महिला शेतकऱ्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सोनिया गांधींना विचारण्यात आलेल्या या प्रश्नावर त्यांनी मजेशीर उत्तर दिलं. "तुम्हीच मुलगी शोधा," असे सोनिया गांधी म्हणाल्या.

10 Janpath Delhi
Shrikant Shinde on Uddhav Thackeray : गोऱ्हे, कायंदे, सातमकर यांच्यासारखे मातब्बर नेते आपल्याला का सोडून जातात ? ; शिंदेंचा ठाकरेंना सवाल

ट्विटरवर राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "सोनीपतच्या शेतकरी बहिणींचे दिल्ली दर्शन, त्यांच्यासोबत जेवण आणि खूप मजेशीर गप्पागोष्टी. आई, प्रियंका आणि माझ्यासाठी हा आठवणीतील दिवस.. खास पाहुण्यांसोबत. सोबत मिळालेल्या अनमोल भेटवस्तू- देशी तूप, गोड लस्सी, घरचे लोणचे आणि खूप प्रेम,"

महिला शेतकऱ्यांनी आपल्या सोबत गावरान पद्धतीचे जेवण गांधी परिवासाराठी आणले होते. त्यामध्ये गावरान तूप, गोड लस्सी या पदार्थांचा सामावेश होता. त्यांच्याशी गप्पागोष्टी आणि डान्स केल्याचा व्हिडिओ राहुल गांधींनी शेअर केला आहे.

राहुल गांधी यांनी काही दिवसापूर्वी सोनीपत येथील शेतकऱ्यांशी त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन संवाद साधला होता. त्यांना घरी जेवणाचं निमंत्रण दिलं होते. राहुल गांधी यांना भेटण्यासाठी दिल्लीतील 10 जनपथ या निवासस्थानी काही महिला आल्या होत्या. "अजून वेळ गेलेली नाही. लग्न करा, आम्ही वरातीत येऊ," असा सल्ला आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींना नुकताच दिला होता.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com