
New Delhi News: पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान, आणि न्यूझीलंड संघाचा पराभव करत भारतीय क्रिकेट संघानं चॅम्पियन्स ट्रॉफीची उपांत्य फेरी गाठली.एकीकडे संपूर्ण देशभरात क्रिकेटप्रेमींचा जल्लोष सुरू असतानाच दुसरीकडे काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माविषयी केलेली टिप्पणी वादात सापडली. यानंतर प्रचंड ट्रोल झाल्यानंतर आता पुन्हा एकदा शमा मोहम्मद (Shama Mohamed) चर्चेत आल्या आहेत.
काँग्रेसच्या (Congress) नेत्या शमा मोहम्मद यांनी आता थेट इस्लामबाबत मोठा दावा केला आहे. त्यांनी जगभरातलं गणित हे इस्लाममधून आल्याचं खळबळजनक विधान केलं आहे. त्यांचं वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. भाजप नेत्यांनी शमा मोहम्मद यांच्यावर खोचक टिप्पणी करत त्यांची तुलना थेट लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधींशी केली आहे.
शमा मोहम्मद यांनी रोहित शर्माच्या शरीरावर टिप्पणी करत त्याला 'जाड खेळाडू' म्हणाल्यानंतर देशभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती.यानंतर काँग्रेस पक्षानं रोहितविषयीच्या विधानावरून हात झटकत संबंधित शमा मोहम्मद यांना संबंधित पोस्ट हटवण्याचे निर्देश देतानाच तंबी दिली होती.
मात्र, शमा मोहम्मद यांनी काँग्रेस पक्षाचा इशारा फार गांभीर्यानं घेतलेला दिसून येत नाही.कारण पुन्हा काही दिवसांतच त्यांनी नवं वाद ओढवणारं वक्तव्य केलं आहे.जगभरात गणित हे इस्लाममधून आलं असल्याचा दावा आता शमा यांनी केला आहे.त्यामुळे भाजपसह सोशल मीडियावर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.
यावर काँग्रेसमध्ये केवळ राहुल गांधी हेच बालिश वक्तव्य करु शकत नाहीत.तिथे अनेक लोक आहेत,जे राहुल गांधींपेक्षा अधिक बालिशपणा करु इच्छित आहेत.या लोकांनी आता राहुल गांधींसोबतच स्पर्धा सुरु केली असल्याचा टोला भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेसला लगावला आहे.
काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी रोहितच्या शरीरावर टिप्पणी केली होती. वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी एक्सवर लिहिलेला मजकूर हटवला आहे. शमा यांनी रोहित हा जाड खेळाडू असल्याचे म्हटले होते. तसेच भारताचा आतापर्यंतचा सर्वात निराशाजनक कॅप्टन असल्याचे विधानही त्यांनी केले होते. त्त्याला वजन कमी करण्याची गरज असल्याचा सल्लाही त्यांनी दिला होता. शमा यांच्या या टिप्पणीनंतर मोठा वाद निर्माण झाला होता.
त्यानंतर शमा यांनी आपली पोस्ट डिलिट करत त्यांच्या विधानाबाबत खुलासाही केला होता.त्या म्हणाल्या होत्या,आपण खेळाडूच्या फिटनेसविषयी ट्विट केले होते. त्यामध्ये शारिरीक व्यंगावर बोलण्याचा हेतू नव्हता.खेळाडूनं फिट असायला हवं, असं मला वाटते. त्याचं वजन थोडं जास्त आहे, असं मला वाटलं. म्हणून त्याविषयी मी ट्विट केलं.मात्र, त्यावरून विनाकारण वाद निर्माण करण्यात आला.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.