Narendra Modi in Gujarat : मोदींच्या मार्गात आलेल्या मुलाला पोलिसाकडून चोप; थेट निघाले बदलीचे आदेश, वेतनवाढही रोखली

Gujarat Police News Viral Video : गुजरातमधील लिम्बायत याठिकाणी ही घटना घडली होती. पंतप्रधान मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Police News : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात दौऱ्यामध्ये त्यांच्या मार्गात आलेल्या एका मुलाला पोलिस उपनिरीक्षकाने चोप दिल्याची घटना गुरूवारी घडली होती. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. आता या पीएसआयला गृह विभागाने शिक्षा दिली आहे. काही तासांतच संबंधित पोलिस अधिकाऱ्याची बदली करून वेतनवाढही रोखण्यात आली आहे.

गुजरातमधील लिम्बायत याठिकाणी ही घटना घडली होती. पंतप्रधान मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे त्यांचा ताफा जाणार असलेल्या मार्गांवर नेहमीच कडक सुरक्षाव्यवस्था असते. प्रत्यक्ष दौऱ्याआधी संपूर्ण मार्गावर सुरक्षा आणि वाहतुकीची चाचपणी घेतली जाते. ही तयारी सुरू असताना लिम्बायतमध्ये एक शाळकरी मुलगा सायकलवर मार्गात आला होता.

PM Narendra Modi
Delimitation Issue : तमिळनाडूसह अनेक राज्यांना ‘फॅमिली प्लॅनिंग’ची शिक्षा; खासदारकी लागली पणाला?

मार्गावर ड्युटीला असलेले पोलिस उपनिरीक्षक बी. एल. गढवी यांनी संबंधित मुलाला हटकले. गढवी यांनी मुलाच्या तोंडावर ठोसा लगावला. त्याचे केस जोरजोरात ओढले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी तातडीने संबंधित पोलिस उपनिरीक्षक गढवी यांना शिक्षा दिली आहे.

गढवी यांची सुरतमधून मोरबी याठिकाणी बदली करण्यात आली आहे. तसेच एक वर्षासाठी त्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. मोदी शुक्रवारी सायंकाळी लिम्बायत येथे एका कार्यक्रमानिमित्त येणार होते. त्यासाठी गुरूवारी ताफ्याच्या मार्गावर तयारीची चाचपणी घेतली जात होती. यादरम्यान ही घटना घडली.

PM Narendra Modi
Shri Ram Son Samadhi : श्रीरामांचे पुत्र लव यांची पाकिस्तानात समाधी; काँग्रेस नेत्यानं दिली महत्वाची माहिती...

लिम्बायतमधील मुख्य रस्त्यावर तयारी सुरू असताना सायकल चालवत असलेला एक मुलगा गढवी यांना दिसला. त्यांनी संबंधित मुलाला थांबवून त्याचे केस पकडले आणि जोरजोरात ओढले. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ एका व्यक्तीने इमारतीवरून घेतला आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शुक्रवारी सुरत वाहतूक शाखेच्या उपायुक्त अनिता वनानी यांनी सांगितले की, ‘संबंधित पोलिस उपनिरीक्षकांना पंतप्रधानांच्या बंदोबस्तापासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यांना कंट्रोल रूममध्ये ड्यूटी देण्यात आली आहे.’ त्यानंतर विशेष शाखेचे उपायुक्त हेतल पटेल यांनी प्रसिध्दीपत्रक काढत गढवी यांची मोरबी येथे बदली करण्यात आल्याची माहिती दिली.

PM Narendra Modi
Pawar Vs Pawar : पवारांच्या बालेकिल्ल्यात इतर संघटनांचाही शड्डू; तावरेही मैदानात येणार?

पोलिस एवढ्यावर थांबले नाहीत. लिम्बायत पोलिसांनी संबंधित मुलाचा शोध घेऊन पोलिस ठाण्यात आणले आणि त्याचा जबाब घेतला. संबंधित मुलगा काही दिवसांपूर्वी नेपाळमधून सुरतमध्ये आला आहे. तो त्यांच्या नातेवाईकांकडे राहत आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

  २५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com