

Sonia Gandhi admitted hospital : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती ढासळली आहे. उपचारासाठी त्यांनी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोनिया यांचे पुत्र लोकसभा विरोधी पक्षनेता राहुल गांधी आणि मुलगी खासदार प्रियंका गांधी या त्यांच्याबरोबर आहे. सोनिया गांधी यांना त्यांच्या डोळ्याच्या उपचारासंदर्भात रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. डोळ्यावर छोटीशी शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगितले जात आहे.
काँग्रेसच्या (Congress) ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना उपचारासाठी गुरूग्राम इथल्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त समोर येताच, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्या डोळ्यांच्या उपचारासंदर्भात रुग्णालयात दाखल झाल्या असून, थोड्याच वेळात त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची अलीकडच्या काळात प्रकृतीसंदर्भात सातत्याने तक्रारी समोर आल्या आहेत. जून 2025 मध्ये त्यांना पोटातील संसर्ग झाल्याने दिल्लीत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी औषधोपचार आणि विशेष आहार व्यवस्थापनाद्वारे उपचार केले.
शिमला दौऱ्यादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटल्याने तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी रक्तदाब किंचित वाढलेला असल्याची माहिती समोर आली होती. 2026च्या सुरवातीला त्यांना खोकला आणि श्वसनासंबंधी त्रासामुळे पुन्हा निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते.
सोनिया गांधी काँग्रेसच्या सर्वात प्रमुख नेत्यांपैकी एक आहे. अनेक दशकांपासून त्या पक्षाचे नेतृत्व करत आहेत. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी अनेक वर्षे सक्रिय राजकारणापासून दूर राहिल्या होत्या. मात्र पक्षातील नेत्यांच्या सातत्यपूर्ण आग्रहानंतर त्यांनी 1997 मध्ये सक्रिय सार्वजनिक जीवनात प्रवेश केला.
1998 मध्ये त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आणि सलग 22 वर्षे पक्षाचे नेतृत्व केले. त्यामुळे त्या काँग्रेसच्या इतिहासातील सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिलेल्या महिला नेत्या ठरल्या. त्यानंतर 2019 मध्ये त्या पुन्हा एकदा या पदावर परतल्या आणि पुढील तीन वर्षे त्यांनी ही जबाबदारी सांभाळली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.