Kangana Ranaut : काँग्रेसकडून कंगना रनौतला 'ओपन चॅलेंज'; सोनिया गांधींवरील वादग्रस्त वक्तव्य भोवणार

Congress Sonia Gandhi BJP Mandi MP : कंगना रनौत यांच्याकडून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य केली जातात. अशी विधाने न करण्याबाबत भाजपकडूनही तंबी देण्यात आली आहे.  
Sonia Gandhi, Kangana Ranaut
Sonia Gandhi, Kangana RanautSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : भाजपच्या हिमाचल प्रदेशातील खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा वादात अडकल्या आहेत. यावेळी काँग्रेसने त्यांच्यावर थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. कंगना यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींविषयी केलेले वादग्रस्त वक्तव्य पक्षातील नेत्यांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे.

हिमाचल प्रदेशला आपत्ती व्यवस्थापनासाठी मिळणार निधी राज्य सरकारकडून बेकायदेशीरपणे सोनिया गांधींकडे पाठवला जात असल्याचे विधान कंगना यांनी रविवारी केल होते. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी यावरून पलटवार करत वॉर्निंग दिली आहे.

Sonia Gandhi, Kangana Ranaut
Chirag Paswan : चिराग पासवान भाजपशी आघाडी तोडणार? निवडणूक जाहीर होण्याआधी घेणार निर्णय...

कंगना रनौत यांनी आपले विधान मागे घेतली नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, मानहानीचा दावा दाखल करू, असा इशारा विक्रमादित्य सिंह यांनी दिला आहे. त्यांनी कोणत्या आधारावर हे विधान केले आहे? सोनिया गांधींविषयी असे विधान करणे दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले.

केंद्र सरकारकडून निधी येणे किंवा विकासासाठीचा निधी सोनिया गांधी देणे, अशी करणे खूपच मुर्खपणाचे आहे. मी कंगना यांना खुले चॅलेंज देतो की त्यांनी निधी वळवल्याचा किमान एक रुपयाचा तरी पुरावा द्यावा. अन्यथा अशा आधारहीन विधानांबाबत सोनिया गांधी यांची माफी मागावी, असे चॅलेंज विक्रमादित्य सिंह यांनी दिले.

Sonia Gandhi, Kangana Ranaut
 Arvind Kejriwal : ...तोपर्यंत केजरीवालांची खुर्ची रिकामी राहणार! मुख्यमंत्री आतिशी यांची पहिल्याच दिवशी मोठी घोषणा

शेतकरी आंदोलनाविषयी कंगना यांनी केलेल्या विधानावरून भाजपने असे न बोलण्याची तंबी दिली आहे. त्यावरूनही सिंह यांनी निशाणा साधला. पक्षाच्या नेतृत्वाने सल्ला देऊनही त्यांना त्याची किंमत नसल्याचा टोला विक्रमादित्य यांनी लगावला.

काय म्हणाल्या होत्या कंगना?

कंगना यांनी रविवारी म्हटले होते की, काँग्रेस आणि नैसर्गिक संकटांनी राज्याला अनेक दशके मागे नेले आहे. आम्ही (केंद्र सरकार) राज्याला आपत्ती व्यवस्थापन निधी देतो. हा निधी मुख्यमंत्री रिलिफ फंडमध्ये जायला हवा. पण प्रत्येकाला माहिती आहे की हा निधी ‘सोनिया रिलिफ फंड’मध्ये जातो.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com