Jammu-Kashmir Politics: जम्मू-काश्मीरमध्ये मोठा ट्विस्ट, काँग्रेस ओमर अब्दुल्लांच्या सरकारमध्ये सामील होणार नाही; कारण...

Jammu-Kashmir News: तब्बल 10 वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन होत आहे. ओमर अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होणार आहेत.
omar abdullah | mallikarjun kharge | Farooq abdullah | rahul gandhi
omar abdullah | mallikarjun kharge | Farooq abdullah | rahul gandhisarkarnama
Published on
Updated on

Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स पार्टी ( एनसी ) आणि काँग्रेसच्या युतीनं भाजपचा धुव्वा उडवला. ओमर अब्दुल्ला यांच्या ‘नॅशनल कॉन्फरन्स’ला 42, काँग्रेसला 6 मिळाल्या.

भाजपला 29 जागांवर समाधान मानावे लागलं. यानंतर ओमर अब्दुल्ला आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, जम्मू-काश्मीरच्या राजकारणात एक ट्विस्ट आला आहे.

ओमर अब्दुल्ला यांच्यासह 10 जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पण, काँग्रेसचा (Congress) एकही आमदार आज शपथ घेणार नाही. सरकारमध्ये सामील व्हायचं की बाहेरून पाठिंबा द्यायचा, याबद्दल काँग्रेसमध्ये खल सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेसचे जम्मू-काश्मीरचे प्रभारी भरत सिंह सोलंकी म्हणाले, “मंत्रिपद वाटपाबद्दल नंतर निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत ‘नॅशनल कॉन्फरन्स’सोबत चर्चा सुरू आहे. काँग्रेस युतीत आहे. मात्र, आज कोणीही काँग्रेसचा आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार नाही. कारण, सरकारमध्ये सामील व्हायचं की बाहेर समर्थन द्यायचं? याबद्दल चर्चा सुरू आहे.”

omar abdullah | mallikarjun kharge | Farooq abdullah | rahul gandhi
Jammu and Kashmir Government : अखेर अब्दुल्लांचा ‘राज’मार्ग मोकळा; राष्ट्रपतींनी काढला आदेश

कोण घेणार मंत्रिपदाची शपथ?

काँग्रेसचा कुणीही आमदार शपथ घेत नसल्यानं ओमर अब्दुल्ला यांच्यासह सकीना इटू, मीर सैफुल्ला, अब्दुल रहीम राथर, काश्मीरमधून अली मोहम्मद सागर/ सलमान सागर, जावेद राणा, सुरिंदर चौधरी, सज्जाद शाहीन आणि सतीश शर्मा हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com