Jammu and Kashmir Government : अखेर अब्दुल्लांचा ‘राज’मार्ग मोकळा; राष्ट्रपतींनी काढला आदेश

Droupadi Murmu Omar Abdullah President Rule : जम्मू आणि काश्मीरमध्ये 2018 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
Omar Abdullah
Omar AbdullahSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने बहुमत मिळवत पुन्हा सत्ता काबीज केली आहे. त्यानंतर आता ओमर अब्दुल्लांचा पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा ‘राज’मार्गही मोकळा झाला आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी रात्री जम्मू आणि काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट उठवण्याचा आदेश जारी केला केला. नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी राष्ट्रपती राजवट हटवण्यात आल्याने आज अब्दुल्ला हे शपथ घेण्याची शक्यता आहे.

Omar Abdullah
Mallikarjun Kharge : सिद्धरामय्या गोत्यात, खर्गेंनी घेतला धसका; पाच एकर जमिनीबाबत मोठा निर्णय

2018 मध्ये भाजपने मेहबुबा मुफ्ती यांचा पाठिंबा काढून घेतल्याने तत्कालीन सरकार कोसळले होते. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. तब्बल 10 वर्षांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुफ्तींसह भाजपलाही बहुमताचा आकडा गाठता आला नाही. अब्दुल्लांच्या पक्षाने राज्यात घवघवीत यश मिळवत पुन्हा सत्ता काबीज केली आहे.

नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष असलेल्या ओमर अब्दुल्ला पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहेत. त्यांनी शुक्रवारीच नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. त्यानंतर रविवारी रात्री राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली.

Omar Abdullah
Rahul Gandhi : नाशिकमधील घटनेनंतर राहुल गांधींचा मोदी सरकारवर प्रहार; पुन्हा ‘जय जवान’चा नारा

आघाडीला राज्यात 90 पैकी 48 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक 42 जागा अब्दुल्लांच्या पक्षाने जिंकल्या आहेत. काँग्रेसला केवळ सहा जागांवर विजय मिळाला आहे. तर निवडून आलेल्या काही अपक्षांनीही अब्दुल्लांना पाठिंबा जाहीर केला आहे.

जम्मू आणि काश्मीरची 31 ऑक्टोबर 2019 रोजी फाळणी करून दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख हे स्वतंत्र प्रदेश अस्तित्वात आले. त्याआधी काश्मीरमधून 370 कलम हटवण्यात आले होते. यानंतर पहिल्यांदाच काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक झाली.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com