MLA Santosh Bangar On MP Jadhav
MLA Santosh Bangar On MP JadhavSarkarnama

Santosh Bangar On MP Jadhav: खासदार जाधव स्वार्थी, त्यांनी लोकांचे रक्त पिण्याचेच काम केले...

Parbhani Political News : तुम्ही काय होतात हे सर्वांना माहीत आहे. आमदार होण्यापूर्वीची तुमची दशा काय होती अन् आता काय आहात?
Published on

Shivsena Politics News : शिवसेनेत फूट पडल्यापासून दोन्ही गट एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहेत. आरोप-प्रत्यारोप आणि एकमेकांवर कुरघोडीचे प्रयत्न यामुळे लोकांचे मात्र चांगलेच मनोरंजन होत आहे. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे आपल्या विधानांमुळे अनेकदा वादात सापडले. कधी अधिकाऱ्याच्या कानाखाली काढ, तर कधी त्यांना धमकी दिल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजही दिली होती.

MLA Santosh Bangar On MP Jadhav
Protest For Maratha Reservation : मराठा समाजानं तुम्हाला मोठं केलं, आता समाजाला मोठं करा...

मात्र, शिवसैनिकाची भाषा अशीच असते म्हणत त्यांनी आपला कार्यक्रम तसाच सुरू ठेवला. बांगर यांच्या निशाण्यावर आता परभणीचे खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) हे आहेत. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी जाधव यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप केले.

इथला नेता स्वार्थी आहे, आतापर्यंत त्यांनी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवूनच आपला स्वार्थ साधला. (Shivsena) आतापर्यंतच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी फक्त लोकांचे रक्त पिण्याचे काम केले, अशी टीकाही बांगर (Santosh Bangar) यांनी केली.

परभणी येथील नेत्याने आतापर्यंत केवळ कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वार्थ साधला. त्याचा इतिहास सर्वांना माहीत आहे, पण कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणाचा बळी घेऊ नका? तुम्ही काय होतात हे सर्वांना माहीत आहे. आमदार होण्यापूर्वीची तुमची दशा काय होती अन् आता काय आहात?

हे बघितले तर केवळ लोकांचे रक्त पिण्याचे काम त्यांनी केले आहे, शेवटी तेसुद्धा कमी पडले. आपण लोकप्रतिनिधी असताना सामान्य जनता भेटायला गेली, तर त्यांना कमरेखालच्या शिव्या देण्यात येतात. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत हीच मायबाप जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल, असा इशाराही बांगर यांनी या वेळी दिला. आता यावर जाधवांकडून काय प्रत्युत्तर दिले जाते हे पाहावे लागेल.

MLA Santosh Bangar On MP Jadhav
Sharad Pawar in Killari : भूकंपानंतर मदतीचा हात देणाऱ्या शरद पवारांबद्दल किल्लारीकर व्यक्त करणार कृतज्ञता...

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केले तेव्हा परभणीचे खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले. पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याबद्दल जिल्ह्यात खासदार जाधव, आमदार पाटील यांचे कौतुकही झाले. परंतु आगामी लोकसभा निवडणुका पाहता आता शिंदे गटाने ठाकरेंसोबत राहिलेल्या खासदारांना लक्ष केल्याचे बोलले जाते.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com