OBC महासंघाचे अधिवेशन; शरद पवार, देवेंद्र फडणवीस येणार एकाच मंंचावर

OBC Federation| अधिवेशनात एकूण बावीस ठराव मांडणार
OBC Federation|
OBC Federation|
Published on
Updated on

नवी दिल्ली : आज सकाळी 10 वाजता येथील तालकटोरा इनडोअर स्टेडियममध्ये राष्ट्रीय ओबीसी (OBC) महासंघाचे सातवे महाअधिवेशन सुरू होणार आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पटेल चौक ते तालकटोरा इनडोअर स्टेडियम या मार्गाने ओबीसी बांधवांची रॅली निघणार होती. पण प्रशासनाने रॅलीला परवानगी नाकारलेली आहे. रॅलीला परवानगी नाकारली असली तरीही ओबीसींचे हे सातवे महाअधिवेशन होणार आणि यशस्वी होणार,असा विश्वास राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केला.

या अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता या महाअधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. आजच्या अधिवेशनात एकूण बावीस ठराव मांडण्यात येणार आहेत. त्यामध्ये नॉन क्रिमीलेअरची अट ओबीसींसाठी रद्द करावी, ही प्रमुख मागणी आहे. ही अट केंद्र सरकार रद्द करू शकते. त्यामुळे या अधिवेशनातून ही प्रमुख मागणी लावून धरण्यात येणार आहे. त्यासाठीच हे अधिवेशन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन म्हणजे एक प्रकारे ओबीसी बांधवांचे शक्तिप्रदर्शन असणार आहे. या माध्यमातून केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.

OBC Federation|
त्यावेळी Jagdeep Dhankhar यांनी अचानक राजकीय प्रवास थांबवला, अन्...

आज सकाळी देशभरातून ओबीसी बांधव येथे यायला सुरुवात झाली आहे. हळूहळू तालकटोरा लेन ओबीसी बांधवांनी गजबजू लागलेली आहे. येथे डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्यासह राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिव डॉक्टर अशोक जिवतोडे सचिन राजूरकर आदी मंडळी कालपासूनच नवी दिल्ली येथे आलेली आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या ९ वाजताच्या रॅलीची परवानगी नाकारली. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली. तरीही अधिवेशन होणारच, असे डॉ. बबनराव तायवाडे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com